Join us

'या' सरकारी डिफेन्स स्टॉकमध्ये जोरदार तेजी, वर्षभरात दिला १४०% रिटर्न; एक्सपर्ट्सनं दिलं 'BUY' रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 4:41 PM

Defence PSU Stock to Buy: शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी (१६ ऑगस्ट) जोरदार झाली. या तेजीमध्ये सरकारी संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी दिसून आली.

Defence PSU Stock to Buy: शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी (१६ ऑगस्ट) जोरदार झाली. या तेजीमध्ये सरकारी संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी दिसून आली. निकालानंतर संरक्षण क्षेत्रातील पीएसयू शेअर हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्येही जोरदार तेजी आली. कंपनीच्या निकालानंतर जागतिक ब्रोकरेज हाऊसेस एचएएलवर तेजीत आहेत. गेल्या वर्षभरात या शेअरनं गुंतवणूकदारांना १४० टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय.

जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजनं हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या शेअरवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजनं या शेअरसाठी ५७२५ रुपयांची टार्गेट प्राईज ठेवली आहे. तर नोमुरानं एचएएलवर ५४०० च्या टार्गेट प्राईजसह खरेदीचा सल्ला दिलाय. अशा प्रकारे हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा २० टक्क्यांपर्यंत उत्तम परतावा देऊ शकतो. शुक्रवारी कामकाजाच्या अखेरिस हा शेअर २.३२ टक्क्यांच्या तेजीसह ४७६९.८० रुपयांवर पोहोचला.

पहिल्या तिमाहीचा निकाल काय?

एप्रिल ते जून तिमाहीत एचएएलच्या नफ्यात ७७ टक्के आणि महसुलात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा नफा ८१४ कोटींवरून १४४० कोटींवर गेला आहे. यावेळी ९५४ कोटी रुपयांचा अंदाज होता. तर कान्सोलिडेटेड उत्पन्न ३९१५ कोटीरुपयांवरून ४३४८ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. याचा अंदाज ४४१६ कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर नफा ८७७ कोटींवरून ९९१ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. तो १०७६ कोटी रुपये अपेक्षित होता. कंपनीचं प्रॉफिट मार्जिन २२.४ टक्क्यांवरून २२.८ टक्क्यांवर पोहोचलं आहे. हा अंदाज २४.४ टक्के होता.

वर्षभरात १४० टक्क्यांचा परतावा

एचएएलने शुक्रवारी २.५ टक्क्यांहून अधिक वाढीसह ४७८७.७० वर व्यवहार सुरू केला. हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. दीर्घ मुदतीत या शेअरने दमदार परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरनं १४० टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. सहा महिन्यांत हा शेअर ५५ टक्के आणि यावर्षी आतापर्यंत ६७ टक्क्यांनी वधारलाय. गेल्या ५ वर्षात कंपनीच्या शेअरनं १३५१ टक्क्यांचा दमदार परतावा दिला. बीएसईवर या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ५,६७५ आणि नीचांकी स्तर १,७६७.९५ आहे. कंपनीचं मार्केट कॅप ३.१७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक