Lokmat Money >शेअर बाजार > पहिल्याच दिवशी १००% चा फायदा, शेअर बाजारात एन्ट्री घेताच स्टॉकनं केलं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

पहिल्याच दिवशी १००% चा फायदा, शेअर बाजारात एन्ट्री घेताच स्टॉकनं केलं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Dhanlaxmi Crop Science IPO : या स्टॉकनं शेअर बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५५ रुपये होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:57 IST2024-12-16T11:57:48+5:302024-12-16T11:57:48+5:30

Dhanlaxmi Crop Science IPO : या स्टॉकनं शेअर बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५५ रुपये होती.

Dhanlaxmi Crop Science IPO 100 percent profit on the first day the stock made investors rich as entered the stock market huge return | पहिल्याच दिवशी १००% चा फायदा, शेअर बाजारात एन्ट्री घेताच स्टॉकनं केलं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

पहिल्याच दिवशी १००% चा फायदा, शेअर बाजारात एन्ट्री घेताच स्टॉकनं केलं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Dhanlaxmi Crop Science IPO : धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या स्टॉकनं शेअर बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा शेअर ९० टक्क्यांच्या प्रीमिअमसह १०४.५० रुपयांवर बाजारात लिस्ट झाला आहे. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५५ रुपये होती. धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा आयपीओ ९ डिसेंबर २०२४ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि ११ डिसेंबरपर्यंत खुला होता. धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या पब्लिक इश्यूचा एकूण अंक आकार २३.८० कोटी रुपयांपर्यंत होता. धनलक्ष्मी क्रॉप सायन्स विविध पिकं व भाजीपाल्यासाठी बियाणे विकसित, प्रक्रिया आणि विक्रीचं काम करते.

जबरदस्त लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये वाढ

धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या शेअर्स ९० टक्के प्रीमियमवर लिस्ट झाल्यानंतर त्यात जबरदस्त तेजी आली. धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा शेअर लिस्टिंगनंतर लगेचच ५ टक्क्यांच्या वरच्या स्तरावर १०९.७० रुपयांवर पोहोचला. ५५ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत कंपनीच्या शेअर्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या शेअर्सनं इश्यू प्राइसच्या तुलनेत जवळपास १०० टक्के उसळी घेतली. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ७६.७० टक्के होता, तो आता ५६.३७ टक्क्यांवर आला.

जबरदस्त प्रतिसाद

धनलक्ष्मी क्रॉप सायन्सचा (Dhanlaxmi Crop Science IPO) आयपीओ एकूण ५५५.८३ पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ४४१.१८ पट सब्सक्राइब झाला होता. तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) कॅटेगरीमध्ये १२४१.२७ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. तर क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) कॅटेगरीला १९७.६५ पट सब्सक्रिप्शन मिळालं. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ १ लॉटसाठी बोली लावता येणार होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना १ लॉटसाठी १.१० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Dhanlaxmi Crop Science IPO 100 percent profit on the first day the stock made investors rich as entered the stock market huge return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.