शेअर बाजारात ध्रुव कॅपिटल या फायनान्स क्षेत्रातील कंपनीच्या शअरने गेल्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कालावधीत या शेअरमध्ये 5900 टक्क्यांनी जोरदार वाढ झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये हा स्टॉक ₹3.5 वर होता. तो आता ₹210 वर पोहोचला आहे. याचाच अर्थ डिसेंबर 2020 मध्ये या पेनी स्टॉकमध्ये केलेली ₹10,000 ची गुंतवणूक या वर्षी ₹6 लाखवर पोहोचली असेल. तर या शेअरने गेल्या एका वर्षात 842% टक्के एवढा परतावा दिला आहे. या वर्षात या शेअरमध्ये आतापर्यंत 756% ची तेजी दिसून आली आहे. गेल्या वर्षातील डिसेंबर महिन्यात हा स्टॉक 23.41 रुपयांच्या जवळपास व्यवहार करत होता.
शेअरची कामगिरी -
या वर्षातील 12 महिन्यांपैकी सात महिन्यांत या शेअरने सकारात्मक परतावा दिला आहे. हा शेअर ऑगस्ट मध्ये सपाट होता. तर इतर चार महिन्यांत लाल रंगावर होता. तर इतर 7 महिन्यांत या शेअरने डबल डिजिटमध्ये परतावा दिला आहे. जानेवारी महिन्यात या शेअरने सर्वाधिक म्हणजेच 90 टक्के वृद्धी झाली. यानंतर सप्टेंबर महिन्यात 63 टक्क्यांची वृद्धि झाली. यातच, नोव्हेंबर आणि एप्रिल या दोन्ही महिन्यात हा शेअर जवळपास 53 टक्क्यांनी वधारला. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत या शेअरमध्ये 45 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. जुलै आणि जून महिन्यातही हा शेअर अनुक्रमे 21.5 टक्के आणि 26 टक्क्यांनी वधारला.
मात्र, मे महिन्यात या शेअरमध्ये सर्वाधिक 22.5 टक्क्यांची घसरण झाली. यानंतर ऑक्टोबर महिन्यात हा शेअर 15 टक्क्यांनी घसरला. यावर्षी फेब्रुवारीमहिन्यात 12 टक्के आणि मार्चमध्ये 4 टक्क्यांनी घट झाली आहे. आज 28 डिसेंबर रोजी स्टॉकने ₹210.05 चा विक्रमी उच्चांक गाठला. 28 डिसेंबर 2022 रोजी ₹21.24 च्या 52 आठवड्यांच्या नीचांकी मूल्यावरून तो 889 टक्क्यांनी वाढला आहे.
या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात या शेअरमध्ये 12 टक्के आणि मार्चमध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. हा शेअर आज 28 डिसेंबरला ₹210.05 च्या आप्या उच्चांकावर पोहोचला आहे. तो 28 डिसेंबर, 2022 रोजी आपल्या 52-आठवड्यांचा नीचांक ₹21.24 पेक्षा 889 टक्के वर आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)