टाटा टेकच्या आयपीओला (Tata Technologies Share Allotment) गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, आता कंपनीचे शेअर्स आपल्याला अलॉट झाले आहेत की नाही याबाबत अनेकांना प्रश्न पडलाय. दरम्यान, तुम्ही आयपीओची रजिस्ट्रार लिंक इनटाईम इंडियाच्या वेबसाइटसोबतच बीएसईच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता. ३०४२.५१ कोटी रुपयांचा हा आयपीओ २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान खुला झाला होता. यासाठी ४७५-५०० रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता.
६९.४३ पट सबस्क्राइब
टाटा समूहाचा हा आयपीओ १९ वर्षांहून अधिक काळानंतर आला असून, ६९.४३ पट सबस्क्राइब झाला. या आयपीओमध्ये ऑफर केलेल्या ४.५ कोटी शेअर्सच्या तुलनेत ३१२.६४ कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली मिळाली. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (QIB) हिस्सा सर्वाधिक २०३.४१ पट सबस्क्राईब झालेला.
३० तारखेला होऊ शकतं लिस्टिंग
नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स (NII) कॅटेगरी ६२.११ पट तर किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा १६.५ पट सबस्क्राइब झाला होता. कर्मचार्यांच्या कॅटेगरीत ३.७ पट वर्गणी मिळाली आणि इतर कॅटेगरी २९.२० पट सबस्क्राईब झाल्या. टाटा टेक्नॉलॉजीचे शेअर्स गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केले जाऊ शकतात.
कसं चेक कराल स्टेटस?
स्टेप १. BSE च्या वेबसाइटवर जा.
स्टेप २. 'इक्विटी' निवडा आणि नंतर ड्रॉपडाउनमधून IPO चे नाव निवडा.
स्टेप ३. तुमचा अर्ज क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक एन्टर करा.
स्टेप ४. सर्च बटणावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचं अलॉटमेंट स्टेटस दिसेल.
रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर कसं पाहाल
स्टेप १. लिंक इनटाइमच्या वेबसाइटवर जा.
स्टेप २. 'कंपनी सिलेक्शन'वर क्लिक करा आणि नंतर आयपीओचं नाव निवडा.
स्टेप ४. आता तुमचा पॅन, अर्ज क्रमांक, डीपी/क्लायंट आयडी किंवा खाते क्रमांक/IFSC एन्टर करा.
स्टेप ४. आता 'Search' वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा अलॉटमेंट स्टेटस दिसेल.
ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स अलॉट होतील त्यांचे शेअर्स २९ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होतील.