Lokmat Money >शेअर बाजार > १ शेअरवर मिळणार ₹१०० चा डिविडेंड, 'या' कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मिळणार १ वर ४ शेअर्स; जाणून घ्या

१ शेअरवर मिळणार ₹१०० चा डिविडेंड, 'या' कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मिळणार १ वर ४ शेअर्स; जाणून घ्या

या शेअरला काल म्हणजेच ५ जुलै रोजी २ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 03:00 PM2024-07-06T15:00:21+5:302024-07-06T15:00:36+5:30

या शेअरला काल म्हणजेच ५ जुलै रोजी २ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे.

Dividend of rs 100 on 1 share shareholders Kaycee Industries company will give 4 bonus shares on 1 | १ शेअरवर मिळणार ₹१०० चा डिविडेंड, 'या' कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मिळणार १ वर ४ शेअर्स; जाणून घ्या

१ शेअरवर मिळणार ₹१०० चा डिविडेंड, 'या' कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मिळणार १ वर ४ शेअर्स; जाणून घ्या

Dividend Stock News: कायसी इंडस्ट्रीजच्या (Kaycee Industries) शेअर्समध्ये शुक्रवारी शेअर बाजारात एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिटसह व्यवहार झाला. या शेअरला काल म्हणजेच ५ जुलै रोजी २ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे.

१० भागांत विभागला शेअर

कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार १०० रुपये फेस व्हॅल्यू असलेला शेअर १० भागांमध्ये विभागला जाईल. या शेअर विभाजनानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १० रुपये प्रति शेअरपर्यंत खाली आली. त्याचबरोबर कंपनी प्रत्येक शेअरवर ४ बोनस शेअर्स देखील देणार आहे. बोनस शेअर्स आणि शेअरच्या स्प्लिटची रेकॉर्ड डेट ५ जुलै निश्चित करण्यात आली होती. आता ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांना याचा फायदा होणार आहे.

डिविडंड किती देणार कंपनी?

कंपनीनं गुंतवणूकदारांना लाभांशही जाहीर केला आहे. कंपनीनं २८ मे रोजी शेअर बाजारांना सांगितले होतं की, ३१ मार्च रोजी संपलेल्या प्रत्येक आर्थिक वर्षासाठी एका शेअरवर ६० रुपये अंतिम लाभांश दिला जाईल. कंपनी प्रत्येक शेअरवर ४० रुपयांचा स्पेशल डिव्हिडंड देखील देत आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर १०० रुपयांचा फायदा होणार आहे. कायसी इंडस्ट्रीजने या लाभांशाची रेकॉर्ड डेट ९ ऑगस्ट निश्चित केली आहे.

शेअरची स्थिती काय?

शुक्रवारी २ टक्क्यांच्या अपर सर्किटनंतर बीएसईमध्ये कंपनीचा शेअर १३६५.५० रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ४७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत २१७ टक्के नफा झालाय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Dividend of rs 100 on 1 share shareholders Kaycee Industries company will give 4 bonus shares on 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.