Join us

दिवाळीपूर्वी शेअर बाजार उत्साह परतला; FII विक्रीला अखेर ब्रेक; या क्षेत्रातील शेअर्सने खाल्ला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 4:04 PM

Share Market Today : शेअर बाजारातील या नेत्रदीपक वाढीमुळे बीएसईचे मार्केट कॅप ४४१.५४ लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे.

Stock Market : या आठवड्यातील मुहूर्त ट्रेडिंग आणि दिवाळीचे पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी शुभं ठरले. या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने होणाऱ्या विक्रीला अखेर ब्रेक लागला. गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सेन्सेक्सने पुन्हा ८०००० चा टप्पा ओलांडला. बाजारातील या तेजीत बँकिंगसह सर्वच क्षेत्रांचा वाटा आहे. आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही खरेदी दिसून आली. बाजार बंद होतना BSE सेन्सेक्स ६०३ अंकांनी वधारून ८०००५ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५८ अंकांनी वाढून २४,३३९ अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये चढउतारबीएसईवर झालेल्या ४१४७ शेअर्सपैकी २५६५ शेअर्स वाढीसह बंद झाले तर १४२४ शेअर्स घसरले. १५८ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २५ शेअर्स वाढीसह तर ५ शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३७ शेअर्स वाढीसह आणि १३ तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये आयसीआयसीआय बँक ३.०९ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील २.६८ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा २.६६ टक्के, अदानी पोर्ट्स २.५७ टक्के, टाटा स्टील २.४३ टक्के, सन फार्मा २.२४ टक्के, एचयूएल २.१२ टक्के वाढीसह बंद झाले. तर घसरलेल्या शेअर्समध्ये ॲक्सिस बँक १.३० टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.८३ टक्के, टेक महिंद्रा ०.७२ टक्के, एचडीएफसी बँक ०.४६ टक्के आणि मारुती ०.१४ टक्के असा समावेश आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्ती ४.५० लाख कोटींची वाढभारतीय शेअर बाजारात खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४४१.५४ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील ट्रेडिंग सत्रात ४३६.९८ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४.५४ लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.

आजच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रातील शेअर्स बाजारात तेजीसह बंद झाले. बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, धातू, आयटी आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक ०.८३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला तर निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक १.२० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक