Join us  

धनत्रयोदशीला 'या' IPO नं केला गुंतवणूकदारांवर धनवर्षाव, एका शेअर मागे २४ टक्क्यांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:09 AM

कंपनीच्या स्टॉरने शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे.

ESAF स्मॉल फायनान्सने शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. कंपनीचा शेअर बीएसईवर 19.83 टक्के प्रीमियमसह 71.90 रुपयांच्या पातळीवर लिस्ट झालाआहे. मात्र काही वेळाने कंपनीच्या शेअरने 74.70 रुपयांची पातळी गाठली. म्हणजेच या IPO ने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 24.5 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. ESAF स्मॉल फायनान्स IPO ची किंमत 57 रुपये ते 60 रुपये प्रति शेअर पर्यंत निश्चित करण्यात आली होती.3 तारखेला ओपन झालेला आयपीओ ESAF Small Finance चा IPO 3 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. हा IPO सबस्क्राईब करण्यासाठी गुंतवणूकदारांना 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत होती. कंपनीने एका लॉटमध्ये 250 शेअर्स ठेवले होते. यामुळे कोणत्याही किरकोळ गुंतवणूकदाराला किमान 15,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. याशिवाय कोणताही किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी गुंतवणूक करू शकणार होता.77 पट सबस्क्राईबESAF Small Finance चा IPO सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या अखेरच्य दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 2023 रोजी 77 पट सबस्क्राइब झाला होता. अखेरच्या दिवशी, रिटेल कॅटेगरीमध्ये 17.86 पट, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स कॅटेगरीमध्ये 182.66 पट आणि नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीमध्ये 88.81 पट सबस्क्राईब झाला होता.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग