Join us

DMart Share : २०१९ नंतर पहिल्यांदाच एका दिवसात Dmart च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांना कसली भीती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 1:22 PM

Avenue Supermarts Ltd Share Price: डीमार्टची मूळ कंपनी असलेल्या एव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी कंपनीचे शेअर्स ९ टक्क्यांहून अधिक घसरले होते.

Avenue Supermarts Ltd Share Price: डीमार्टची मूळ कंपनी असलेल्या एव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी कंपनीचे शेअर्स ९ टक्क्यांहून अधिक घसरले होते. त्यानंतर बीएसईमध्ये एव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेडचा शेअर ४१४३.६० रुपयांवर आला. २०१९ नंतर कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी या कंपनीचे प्रमोटर आहेत.

राधाकिशन दमानी आणि कंपनीच्या इतर प्रवर्तकांना शेअरमधील घसरणीमुळे मोठा फटका बसला आहे. प्रवर्तकांना आज २०,८०० कोटी रुपयांचे नुकसान झालं. कंपनीतील प्रवर्तकांचा एकूण हिस्सा ७४.६५ टक्के आहे.

शेअर घसरण्यामागील कारण काय?

ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गननं त्यांच्या रेटिंगमध्ये बदल केला आहे. ब्रोकरेज फर्मनं रेटिंग ओव्हरवेटवरून न्यूट्रल वर आणलंय. याशिवाय जेपी मॉर्गननं डीमार्टच्या शेअरची टार्गेट प्राइसही कमी केलीये. नवी टार्गेट प्राइस ५४०० रुपयांवरून ४७०० रुपये करण्यात आली.

दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आलेले नाहीत. ऑनलाइन विक्रीमुळे एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या मेट्रो स्टोअर्सवर दबाव आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या ग्रोसरी विभागावर स्पष्टपणे दिसून येतो. याच कारणामुळे जेपी मॉर्गनने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या महसुली वाढीतही बदल केला आहे.

मॉर्गन स्टॅनलीनंही रेटिंगमध्ये बदल केला

ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने रेटिंगमध्ये कपात केली आहे. एव्हेन्यू सुपरमार्टची टार्गेट प्राइस ३७०२ रुपये करण्यात आली आहे. गोल्डमनसॅकनं डीमार्टचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसनं प्रति शेअर ४००० रुपये अशी टार्गेट प्राइस ठेवली आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक