Join us

तुमच्या पोर्टफोलियोत आहेत का हे शेअर्स? एक्सपर्ट म्हणाले, “खरेदी करा”; पाहा Target-Stoploss

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 5:26 PM

चांगल्या जागतिक संकेतांमुळे तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना या तीन शेअर्समध्ये नशिब आजमावण्याचा सल्ला दिलाय.

गेला आठवडा शेअर बाजारासाठी चांगला ठरला. चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजाराचा कल सकारात्मक आहे. बाजार तज्ज्ञांनी यादरम्यान खरेदीसाठी तीन शेअर्स निवडले आहेत. तेजीसहच त्यांनी यावर टार्गेट आणि स्टॉपलॉसही दिलंय. सेठी फिनमार्टचे विकास सेठी यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, एजिस लॉजिस्टिक्स आणि ईआयडी पॅरीला लाँग टर्म, पोझिशनल आणि शॉर्ट टर्मसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.

लाँग टर्ममध्ये नफाविकास सेठी यांनी लाँग टर्मसाठी ईआयडी पॅरी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर सध्या 468 रुपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीचा साखर आणि इथेनॉलचा व्यवसाय आहे. दोन्ही क्षेत्रं चांगलं काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात साखरेचे दर वाढले आहेत. मागणीही जोरदार आहे. इथेनॉलचीही मागणी सकारात्मक आहे. त्यामुळे संपूर्ण साखर क्षेत्राला फायदा होत आहे, असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या स्टॉकवर 9-12 महिन्यांचं टार्गेट 613 रुपये आहे.

पोझिशनल पिकसाठी 'याची' निवडमार्केट एक्सपर्टने एजिस लॉजिस्टिक शेअरला पोझिशनल पिक म्हणून निवडलx आहे. कंपनीचा शेअर 344 रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहे. हे देशातील आघाडीचं लिक्विड टर्मिनल ऑपरेटर आहे ज्यांचे देशभरात 6 स्ट्रॅटेजिकली ऑपरेटेड टर्मिनल आहेत. कंपनीनं नवीन कॅपेक्स केलेय. कंपनीच्या क्लायंट लिस्टमध्ये HPCL, BPCL, RIL, SAIL, HUL, IOCL सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. त्यांनी या स्टॉकसाठी खरेदीची शिफारस आहे. पोझिशनली टार्गेट 375 रुपये आहे. तसंच स्टॉपलॉस 330 रुपयांचा आहे.

शॉर्ट टर्मसाठी कोणता शेअर?विकास सेठी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स शॉर्ट टर्मसाठी निवडले आहेत. हा शेअर 82 रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहे. सध्याच्या पातळीवर हा शेअर विकत घेण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. डिव्हिडंट यील्ड 3 टक्क्यांच्या जवळपास आहे. मार्च तिमाहीत बँकेचे निकालही उत्कृष्ट होते. शेअरचं शॉर्ट टाईम टार्गेट 86 रुपये आणि 78 रुपयांचा स्टॉपलॉस आहे.

(टीप - यामध्ये देण्यात आलेली माहिती हे तज्ज्ञांचे वैयक्तिक विचार आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारपैसा