Lokmat Money >शेअर बाजार > एका ट्विटमुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

एका ट्विटमुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

donald trump tariff : एका ट्विटने जगभरातील शेअर मार्केटमध्ये खळबळ उडाली होती. सत्य समोर येईपर्यंत अनेक गुंतवणूकदारांचे यात मोठं नुकसान झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:06 IST2025-04-08T17:05:29+5:302025-04-08T17:06:05+5:30

donald trump tariff : एका ट्विटने जगभरातील शेअर मार्केटमध्ये खळबळ उडाली होती. सत्य समोर येईपर्यंत अनेक गुंतवणूकदारांचे यात मोठं नुकसान झाले.

donald trump tariff war one tweet caused havoc in the stock market taking the name of donald trump | एका ट्विटमुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

एका ट्विटमुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

donald trump tariff : ट्रम्प टॅरिफने सोमवारी जगभरातील शेअर बाजार कोसळले. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची दहशत गुंतवणूकदारांमध्ये पाहायला मिळत आहे. कारण, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टने जगभरातील शेअर बाजारात खळबळ उडाली. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर कोणतीही बातम्या खरी समजण्याआधी तिची सत्यता तपासणे आवश्यक आहे. कारण, कधीकधी काही लोक चुकीच्या बातम्या पसरवून शेअर बाजारावर परिणाम करतात. सोमवारी सकाळी अमेरिकन बाजारपेठेतही असेच काहीसे घडले.

एका बातमीने जगभरात खळबळ
सोमवारी सकाळी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका अज्ञात अकाउंटवरून सुरू झालेल्या अफवेने संपूर्ण शेअर बाजार हादरून गेला. सीएनएनच्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी १०:११ वाजता, फक्त १,००० फॉलोअर्स असलेल्या 'हॅमर कॅपिटल' नावाच्या एका छोट्या अकाउंटने दावा केला की ट्रम्प प्रशासन चीन व्यतिरिक्त इतर देशांवरील आयात शुल्कावर ९० दिवसांची स्थगिती देण्याचा विचार करत आहे. फक्त २ मिनिटांनंतर, ८,००,०००+ फॉलोअर्स असलेल्या 'वॉल्टर ब्लूमबर्ग' नावाच्या एका मोठ्या अकाउंटने ही बातमी व्हायरल केली.

बाजारात अचानक वाढ
या बातमीनंतर न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये तात्काळ प्रतिक्रिया उमटल्या. घसरणीला लागलेला बाजार अचानक वर येऊ लागला आणि गुंतवणूकदारांमध्ये आनंदाची लाट पसरली. सीएनबीसी सारख्या मोठ्या व्यावसायिक वृत्तवाहिन्यांनीही ही बातमी पुष्टी न करता ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रसारित करण्यास सुरुवात केली. यामुळे बाजारात वेगाने उलथापालथ झाली.

अमेरिकी सरकारकडून बातमीचं खंडन
व्हायरल झालेल्या बातमीचं व्हाईट हाऊसने खंडन केलं आहे. यानंतर बाजार पुन्हा कोसळू लागले. सीएनबीसी आणि रॉयटर्स यांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली. 'वॉल्टर ब्लूमबर्ग' अकाउंटने त्यांची पोस्ट डिलीट केली. ही बातमी त्यांना रॉयटर्सकडून मिळाली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

काय आहे सत्य?
खरंतर, फॉक्स न्यूजने राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे संचालक केविन हॅसेट यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत, राष्ट्राध्यक्ष टॅरिफला स्थगिती देतील का? असे विचारले होते. त्यावर  हॅसेट यांनी फक्त, "राष्ट्रपती जे काही निर्णय घेतील ते होईल." असं उत्तर दिलं होतं. पण, कोणीतरी यात चुकीची माहिती टाकून ट्रम्प ९० दिवसांसाठी शुल्क थांबवणार असल्याची अफवा पसरवली.

वाचा - एका रात्रीत कसा बदलला गेम? शेअर बाजाराची जोरदार उसळी? 'ही' आहेत ५ कारणे

भविष्यात सतर्क रहा
या घटनेमुळे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले. हेच कारण आहे की गुंतवणूकदारांना नेहमीच सांगितले जाते की सोशल मीडियावरील प्रत्येक बातम्यांवर विश्वास ठेवू नका. याशिवाय, प्रत्येक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांची एकदा उलटतपासणी केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं सोशल मीडियावरील कोणत्याही बातमीवर थेट विश्वास ठेऊ नये.

Web Title: donald trump tariff war one tweet caused havoc in the stock market taking the name of donald trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.