शेअर बाजारात एक शेअर असा आहे, ज्याने गुंतवणूकदारांना एका आठवड्यातच मालामाल केले आहे. या शेअरने या आठवड्यात झटक्यात 105 टक्क्यांचा बम्पर परतावा दिला आहे. अर्थात, या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे एक लाख रुपये केवळ पाच दिवसांतच दोन लाखहून अधिक झाले असणार.
हे शेअर्स श्रीराम अॅसेट मॅनेजमेन्ट (Shriram Asset Management Co Ltd) कंपनीचे आहेत. हे शेअर्स गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांपासून सातत्याने अप्पर सर्किटला टच करत आहेत. कंपनीचे शेअर्स आज शुक्रवारी 10 टक्क्यांनी वाढून 210.85 रुपयांवर बंद झाले.
52 आठवड्यांतील उच्चांकावर -
एएमसीचा स्टॉक 52 आठवड्यांतील उच्चांकावर पोहोचला असून, आपल्याच 195 रुपयांच्या उच्चांकाला मागे टाकले आहे. 13 सप्टेंबर, 2022 रोजी हा शेअर 195 वर पोहोचला होता. तसेच 8 जानेवारी, 2019 रोजी हा शेअर आपल्या 225 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.
BSE नं मांगीतलं Clarifications -
शेअर प्राइसमधील मोठी मुव्हमेन्ट पाहता, बीएसईने कंपनीला क्लेरीफिकेशन मांगितले आहे. यासंदर्भात, BSE ने म्हटले आहे की, एक्सचेन्जने 12 जानेवारी, 2023 रोजी श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडला किंमतीतील उतार-चढावासंदर्भात स्पष्टीकरण मांगीतले आहे. एक्सचेन्जला कंपनीच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)