Lokmat Money >शेअर बाजार > ९० दिवसांत पैसे केले दुप्पट; एप्रिलमध्ये आलेला कंपनीचा IPO; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले... 

९० दिवसांत पैसे केले दुप्पट; एप्रिलमध्ये आलेला कंपनीचा IPO; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले... 

Bharti Hexacom Share: कंपनीनं आयपीओपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. आता कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत तज्ज्ञही बुलिश दिसून येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 01:42 PM2024-07-16T13:42:35+5:302024-07-16T13:42:47+5:30

Bharti Hexacom Share: कंपनीनं आयपीओपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. आता कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत तज्ज्ञही बुलिश दिसून येत आहेत.

Doubled money in 90 days Bharti Hexacom Share IPO in April Experts are bullish | ९० दिवसांत पैसे केले दुप्पट; एप्रिलमध्ये आलेला कंपनीचा IPO; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले... 

९० दिवसांत पैसे केले दुप्पट; एप्रिलमध्ये आलेला कंपनीचा IPO; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले... 

Bharti Hexacom Share: भारती हेक्साकॉमनं आयपीओपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. आता कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत तज्ज्ञही बुलिश दिसून येत आहेत. आज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. कंपनीचा शेअर इंट्रा डे मध्ये ९ टक्क्यांपर्यंत उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.

बीएसईवर भारती हेक्साकॉमचा शेअर ११२३ रुपयांवर उघडला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांकी स्तर ११६५ रुपये आहे. सोमवारच्या बंदच्या तुलनेत हे प्रमाण ९ टक्क्यांनी अधिक आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कंपनीचा शेअर ६ टक्क्यांच्या वाढीसह ११२९ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

टार्गेट प्राईज किती?

सीएनबीसी टीव्ही १८ च्या रिपोर्टनुसार, तज्ज्ञ या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत. जेपी मॉर्गननं या शेअरला १२८० रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे. त्याचवेळी जेफरीजने रेटिंग 'बाय'वरून 'होल्ड' केलं आहे. तर टार्गेट प्राइस १२९० रुपयांवरून कमी करून १२०० रुपये करण्यात आलंय.
भारती हेक्साकॉमचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १३६८.८५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ७५५.२० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ५६,२३२.५० कोटी रुपये आहे.

५७० रुपयांवर आला आयपीओ 

भारती हेक्साकॉमचा आयपीओ एप्रिल २०२४ मध्ये आला होता. कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राइस ५७० रुपये होती. त्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १०४ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारती ग्रुपच्या कंपनीचा २०१२ नंतरचा हा पहिलाच आयपीओ होता.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Doubled money in 90 days Bharti Hexacom Share IPO in April Experts are bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.