Lokmat Money >शेअर बाजार > ११५ रुपयांवर लिस्ट झाला हा IPO; पहिल्याच दिवशी ६० टक्के नफा, लागलं अपर सर्किट

११५ रुपयांवर लिस्ट झाला हा IPO; पहिल्याच दिवशी ६० टक्के नफा, लागलं अपर सर्किट

या शेअरची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली आहे. कंपनीच्या शेअरला पहिल्याच दिवशी अपर सर्किटही लागलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 12:34 PM2023-10-09T12:34:46+5:302023-10-09T12:35:52+5:30

या शेअरची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली आहे. कंपनीच्या शेअरला पहिल्याच दिवशी अपर सर्किटही लागलं.

E Factor Experiences IPO was listed at Rs 115 60 percent profit on the first day upper circuit nse share market Israel Palestine war | ११५ रुपयांवर लिस्ट झाला हा IPO; पहिल्याच दिवशी ६० टक्के नफा, लागलं अपर सर्किट

११५ रुपयांवर लिस्ट झाला हा IPO; पहिल्याच दिवशी ६० टक्के नफा, लागलं अपर सर्किट

E Factor Experiences IPO: ई फॅक्टर एक्सपिरिअन्सेस आयपीओची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली आहे. एनएसईवर कंपनीची ५३.३३ टक्के प्रीमिअमसह ११५ रुपयांवर लिस्टिंग झालं. परंतु काही वेळातच कंपनीच्या शेअर्सना ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. यानंतर कंपनीचे शेअर्स १२०.७५ रुपयांवर पोहोचले. E Factor Experiences IPO गुंतवणूकदारांसाठी २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीपर्यंत खुला होता. यानंतर पात्र गुंतवणूकदारांना ६ ऑक्टोबर रोजी शेअर्स अलॉट करण्यात आले. या आयपीओचा प्राईज बँड ७१ रुपये ते ७५ रुपये निश्चित करण्यात आला होता.

१६०० शेअर्सचा एक लॉट
E Factor Experiences च्या आयपीओची साईज २५.९२ कोटी रुपये होती. कंपनीनं ३४.५६ लाख फ्रेश शेअर्स आयपीओद्वारे जारी करण्यात आले आहेत. कंपनीच्या आयपीओची लॉट साईज १६०० शेअर्सची होती. यामध्ये एखाद्या गुंतवणूकदाराला किमान १ लाख २० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. कोणत्याही गुंतवणूकदाराला जास्तीतजास्त २ लॉटसाठी गुंतवणूक करण्याची संधी देण्यात आली होती.

४ दिवसांत ८० पट सबस्क्राईब
E Factor Experiences कंपनीचा आयपीओ अखेरच्या दिवशी ७३ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला. कंपनीचा आयपीओ ४ दिवसांसाठी खुला होता. या दरम्यान तो ८० टक्क्यांपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला. E Factor Experiences कंपनीनं  अँकर गुंतवणूकदारांद्वारे ७.३८ कोटी रुपये जमवले होते.

काय करते कंपनी?
ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. कंपनी लायटिंग, साऊंडसह अन्य सर्व कार्यक्रमांशी संबंधित कामं करते. E Factor Experiences ला सरकारी प्रोजेक्ट्सही मिळतात. सध्या ही कंपनी दिल्ली, ओदिशा, जयपूर आणि नोएडामध्ये काम करत आहे. 

(टीप: यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: E Factor Experiences IPO was listed at Rs 115 60 percent profit on the first day upper circuit nse share market Israel Palestine war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.