Join us  

११५ रुपयांवर लिस्ट झाला हा IPO; पहिल्याच दिवशी ६० टक्के नफा, लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 12:34 PM

या शेअरची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली आहे. कंपनीच्या शेअरला पहिल्याच दिवशी अपर सर्किटही लागलं.

E Factor Experiences IPO: ई फॅक्टर एक्सपिरिअन्सेस आयपीओची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली आहे. एनएसईवर कंपनीची ५३.३३ टक्के प्रीमिअमसह ११५ रुपयांवर लिस्टिंग झालं. परंतु काही वेळातच कंपनीच्या शेअर्सना ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. यानंतर कंपनीचे शेअर्स १२०.७५ रुपयांवर पोहोचले. E Factor Experiences IPO गुंतवणूकदारांसाठी २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीपर्यंत खुला होता. यानंतर पात्र गुंतवणूकदारांना ६ ऑक्टोबर रोजी शेअर्स अलॉट करण्यात आले. या आयपीओचा प्राईज बँड ७१ रुपये ते ७५ रुपये निश्चित करण्यात आला होता.१६०० शेअर्सचा एक लॉटE Factor Experiences च्या आयपीओची साईज २५.९२ कोटी रुपये होती. कंपनीनं ३४.५६ लाख फ्रेश शेअर्स आयपीओद्वारे जारी करण्यात आले आहेत. कंपनीच्या आयपीओची लॉट साईज १६०० शेअर्सची होती. यामध्ये एखाद्या गुंतवणूकदाराला किमान १ लाख २० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. कोणत्याही गुंतवणूकदाराला जास्तीतजास्त २ लॉटसाठी गुंतवणूक करण्याची संधी देण्यात आली होती.४ दिवसांत ८० पट सबस्क्राईबE Factor Experiences कंपनीचा आयपीओ अखेरच्या दिवशी ७३ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला. कंपनीचा आयपीओ ४ दिवसांसाठी खुला होता. या दरम्यान तो ८० टक्क्यांपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला. E Factor Experiences कंपनीनं  अँकर गुंतवणूकदारांद्वारे ७.३८ कोटी रुपये जमवले होते.काय करते कंपनी?ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. कंपनी लायटिंग, साऊंडसह अन्य सर्व कार्यक्रमांशी संबंधित कामं करते. E Factor Experiences ला सरकारी प्रोजेक्ट्सही मिळतात. सध्या ही कंपनी दिल्ली, ओदिशा, जयपूर आणि नोएडामध्ये काम करत आहे. 

(टीप: यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक