भारतीय शेअर बाजारासाठी 2022 हे वर्ष अत्यंत महत्वाचे ठरले आहे. या वर्षात शेअर बाजाराने अनेक विक्रम केले आहेत. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, याच वर्षात शेअर बाजाराने बिगबुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांना गमावले आहे. झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी वयाच्या 62 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
32000 कोटींचा नफा -
ट्रेंडलाईनवरील उपलब्ध आंकडेवारीनुसार, झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या स्टॉक्समुळे यावर्षी 32,000 कोटींपेक्षाही अधिकची कमाई झाली आहे. हा आकडा 2021 मधील त्यांच्या एकूण होल्डिंगच्या 31 टक्के अधिक आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीस ही रक्कम जवळपास 24,500 कोटी होती. तसेच डिसेंबर 2020 मध्ये ही रक्कम 16,727 कोटी रुपये होती. अशा प्रकारे केवळ दोन वर्षांतच झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील पैसे दुप्पट झाले आहेत.
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचीही गुंतवणूक आहे. यात टाटा ग्रुपची टायटन टॉप होल्डिंग फर्म आहे. या कुटुंबाकडे सेप्टेंबर तिमाहीतपर्यंत टायटनचे 12,318 कोटी रुपयांचे शेअर होते. जे 5.5% एवढा वाटा दाखवतात. खरे तर यावर्षी या स्टॉकने अंडरपरफॉर्म केले आहे. खराब परफॉर्मन्स असतानाही या स्टॉकवर लक्ष ठेवून असलेले 32 विश्लेषकांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
शेअर बाजारातील मोतीलाल ओसवाल यांनी टायटन आणि इंडियन हॉटेल्सचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे इंडियन हॉटेल्सचा शेअरही झुनझुनवाला कुटुंबायांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)