Join us  

ECOS Mobility IPO: ३ दिवसांपासून जबरदस्त डिमांडमध्ये होता 'हा' IPO; आता ग्रे मार्केटमधूनही मोठ्या नफ्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 3:26 PM

ECOS Mobility IPO: एनएसईच्या आकडेवारीनुसार, ६०१ कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीत १,२६,००,००० शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत ८०,८६,९०,२५६ शेअर्ससाठी बोली लागली होती. 

ECOS Mobility IPO: ड्रायव्हर ड्रिव्हन रेंटल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी ईसीओएस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटीचा आयपीओ बंद झाला आहे. निविदेच्या शेवटच्या दिवशी हा आयपीओ ६४.१८ पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, ६०१ कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीत १,२६,००,००० शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत ८०,८६,९०,२५६ शेअर्ससाठी बोली लागली होती. 

क्वालिफाईड इन्स्टीट्युशनल बायर्ससाठी राखीव हिस्सा १३६.८५ पट, तर नॉन इन्स्टीट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी राखीव हिस्सा ७१.१७ पट सब्सक्राइब करण्यात आला. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांचा (आरआयआय) कोटा १९.६६ पट सब्सक्राइब झाला. बुधवारी आयपीओच्या पहिल्या दिवशी इकोस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटीचा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता. हा आयपीओ पूर्णपणे १,८०,००,००० इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलवर (ओएफएस) आधारित आहे.

काय आहे इश्यू प्राईज?

इकोस (इंडिया) मोबिलिटीच्या आयपीओचा प्राइस बँड ३१८ ते ३३४ रुपये प्रति शेअर आहे. या शेअरचा ग्रे मार्केट प्रीमियम १५२ रुपये आहे. या पार्श्वभूमीवर आयपीओची लिस्टिंग ४८६ रुपयांवर होण्याची शक्यता आहे. हे आयपीओच्या इश्यू प्राइसपेक्षा ४५.५१ टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, इकोस (इंडिया) मोबिलिटी २५ वर्षांहून अधिक काळ भारतातील फॉर्च्युन ५०० कंपन्यांसह कॉर्पोरेट ग्राहकांना एम्पलॉई ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस (ईटीएस) आणि ड्रायव्हर कार भाड्यानं (सीसीआर) देत आहे. कंपनी दिल्ली, गुरुग्राम, मुंबई आणि बंगळुरूमध्ये सेल्फ ड्राइव्हसाठी ऑटोमोबाइल देखील ऑफर करते. लक्झरी कोच, मिनीव्हॅन आणि इकॉनॉमी ऑटोमोबाईलसह १२,००० हून अधिक वाहनं ही कंपनी चालवते.

कोण आहेत ग्राहक?

इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड (इंडिगो), एचसीएल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, सेफएक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड, डेलॉयट कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अर्बनक्लॅप टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (अर्बन कंपनी), इंडसइंड बँक लिमिटेड, फोरसाइट ग्रुप सर्व्हिसेस लिमिटेड एफझेडसीओ, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी या ग्राहकांचा समावेश आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार