Lokmat Money >शेअर बाजार > प्रसिद्धीपासून दूर राहिली, दीड वर्षांत लाखाचे पन्नास लाख केले, ज्यांनी IPO त गुंतविले, त्यांनी छप्परफाड कमावले

प्रसिद्धीपासून दूर राहिली, दीड वर्षांत लाखाचे पन्नास लाख केले, ज्यांनी IPO त गुंतविले, त्यांनी छप्परफाड कमावले

कंसल्टिंग सेवा देणारी ईकेआई एनर्जी सर्विसेज (EKI Energy Services) ने ही कामगिरी केली आहे. या कंपनीचा २०२१ मध्ये आयपीओ आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:33 AM2022-08-16T11:33:47+5:302022-08-16T11:57:09+5:30

कंसल्टिंग सेवा देणारी ईकेआई एनर्जी सर्विसेज (EKI Energy Services) ने ही कामगिरी केली आहे. या कंपनीचा २०२१ मध्ये आयपीओ आला होता.

EKI Energy Services IPO: Stayed out of the limelight, made fifty lakhs in a year and a half, those who invested in the IPO earned 3 shares bonus | प्रसिद्धीपासून दूर राहिली, दीड वर्षांत लाखाचे पन्नास लाख केले, ज्यांनी IPO त गुंतविले, त्यांनी छप्परफाड कमावले

प्रसिद्धीपासून दूर राहिली, दीड वर्षांत लाखाचे पन्नास लाख केले, ज्यांनी IPO त गुंतविले, त्यांनी छप्परफाड कमावले

शेअर बाजाराने गेल्या काही काळात अनेकांना मालामाल केलेय, तर अनेकांना कंगालही केले आहे. एलआयसी, पेटीएम सारखे बड्या कंपन्यांच्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना धुपविले आहे. असे असताना एक कंपनी अशी आहे, जी फारशी प्रसिद्ध नव्हती, परंतू त्या कंपनीच्या आयपीओने लाखाचे पन्नास लाख केले आहेत. ते देखील अवघ्या दीड वर्षात. 

कंसल्टिंग सेवा देणारी ईकेआई एनर्जी सर्विसेज (EKI Energy Services) ने ही कामगिरी केली आहे. या कंपनीचा २०२१ मध्ये आयपीओ आला होता. या वेळी शेअरची किंमत १०२ रुपये ठेवण्यात आली होती. ९ एप्रिलला कंपनीचे स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाले होते. याची लिस्टिंग प्रिमिअमसोबत १४० वर झाली होती. याचवेळी चाणाक्ष गुंतवणूकदारांना लक्षात आले होते. अवघ्या काही महिन्यांतच या कंपनीचा शेअर झपाझप वाढून 3149 रुपयांवर गेला होता. जानेवारी २०२२ मध्ये ही वाढ झाली होती. 

प्रसिद्धीच्या झोतापासून ही कंपनी दूर होती. जेव्हा पेटीएम, एलआयसी सारख्या आयपीओंची जोरदार चर्चा होती, तेव्हा ही कंपनी अंडर करंट राहून गुंतवणूकदारांना मालामाल करत होती. गेल्या शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना या कंपनीचा शेअर बीएसईवर 1,724.05 रुपयांवर बंद झाला. जुलैमध्ये कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अफलातून ऑफर दिली होती. कंपनीने त्यांना 3:1 च्या रेशोने बोनस शेअर भेट दिले. म्हणजेच ज्या लोकांकडे कंपनीचा १ शेअर होता, त्यांना कंपनीने बोनस म्हणून तीन शेअर दिले. 

EKI एनर्जीचे शेअर्स 9 एप्रिल 2021 रोजी 140 रुपयांवर सूचीबद्ध झाले. यानंतर कंपनीचे बोनस शेअर्स देण्यात आले. यामुळे सूचीच्या वेळी शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला EKI एनर्जी सर्व्हिसेसचे 714 शेअर्स मिळाले. हे शेअर्स 2856 पर्यंत वाढले. 1,724.05 रुपयांच्या हिशेबानुसार ही १ लाखाची गुंतवणूक आता 49.23 लाखांवर गेली आहे. 

Web Title: EKI Energy Services IPO: Stayed out of the limelight, made fifty lakhs in a year and a half, those who invested in the IPO earned 3 shares bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.