Join us  

Avalon Technologies IPO: पैसा कमविण्याची संधी! आज इलेक्ट्रीक कंपनीचा आयपीओ येतोय; गोल्डमॅन, HDFC, महिंद्राचीही गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 9:51 AM

Share Market IPO: स्थापना 1999 मध्ये चेन्नई येथे झाली. ही एक EMS कंपनी आहे. कंपनी आपली उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेत तसेच अमेरिका, चीन, नेदरलँड आणि जपानमध्ये विकते.

शेअर बाजारात आज पैसे गुंतविण्याची संधी आहे. आयपीओत तुम्हाला पैसे टाकायचे असतील तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस कंपनी एवलॉन टेक्नॉलॉजीसचा सोमवारी म्हणजेच आज तीन एप्रिलला आयपीओ उघडणार आहे. हा आय़पीओ रिटेल गुंतवणूकदारांसाठी ६ एप्रिलपर्यंत खुला राहणार आहे. 

एवलॉन टेक्नॉलॉजीसच्या आयपीओचा प्राईज बँड 415 रुपये प्रति शेयर ते 436 रुपये प्रति शेयर ठरविण्यात आला आहे. यामध्ये ७५ टक्के वाटा हा क्युआयबीसाठी असून १५ टक्के कोटा हा एनआयआयसाठी व उरलेला १० टक्के कोटा सामान्य गुंतवणूकदारांसाठी असणार आहे. Avalon Technologies ची स्थापना 1999 मध्ये चेन्नई येथे झाली. ही एक EMS कंपनी आहे. कंपनी आपली उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेत तसेच अमेरिका, चीन, नेदरलँड आणि जपानमध्ये विकते.

Avalon Technologies चे या IPO द्वारे 865 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये 320 कोटी रुपयांच्या फ्रेश इश्यूचा आणि 545 कोटी रुपयांच्या OFSचा समावेश आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराला या IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याला 14,824 रुपयांच्या किमान 34 शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. यामध्ये कोणताही गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉट म्हणजेच 442 शेअर्ससाठी 1,92,712 रुपयांची बोली लावू शकतो.

या आयपीओपूर्वी कंपनीने 24 अँकर गुंतवणूकदारांकडून 389.25 कोटी रुपये उभे केले आहेत. यामध्ये गोल्डमन सॅक्स फंड, एचडीएफसी लार्ज अँड मिडकॅप फंड, फ्रँकलिन इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड, व्हाईटओक कॅपिटल फंड, आयआयएफएल सिलेक्ट सीरीज II, महिंद्रा मॅन्युलाइफ फंड आणि नोमुरा इंडिया स्टॉक मदर फंड यांचा समावेश आहे.  

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार