Join us  

Electronics Mart India IPO: ५३% प्रीमिअमवर लिस्ट झाला हा IPO, एका झटक्यात गुंतवणूकदार झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 1:50 PM

Electronics Mart India IPO: या कंपनीचा आयपीओ आज एनएससीवर ५३ टक्के प्रीमिअमवर लिस्ट झाला. ज्यांना हा आयपीओ अलॉट झाला, त्यांना लिस्टिंगसोबतच मोठा फायदा झाला आहे. 

Electronics Mart India IPO: इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. कंपनीने बाजारात प्रवेश करताच गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 51% च्या प्रीमियमसह लिस्ट झाले. ज्या गुंतवणूकदारांना यात शेअर मिळाले होते, त्यांना लिस्टिंगसह प्रति शेअर 30 रुपये नफा मिळाला आहे. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 52% पेक्षा जास्त प्रीमियमसह सूचीबद्ध झाले. आजच्या प्री-ओपनिंग सत्रात कंपनीचे शेअर्स 38.98% च्या प्रीमियमवर ट्रेड करत होते. त्यानंतर, शेअर्सने  50 टक्क्यांचा प्रीमिअम देखील ओलांडला. कंपनीचा IPO 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत खुला होता.

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडचा 500 कोटींचा आयपीओ आला होता. त्याचा प्राईज बँड (Electronics Mart India Ltd Price Band) प्रति शेअर 56-59 रुपये निश्चित करण्यात आला होती. या IPO साठी गुंतवणूकदारांना किमान 254 शेअर्ससाठी अर्ज करायचा होता. म्हणजेच किमान एका गुंतवणूकदाराला 14,986 रुपये गुंतवावे लागणार होते. त्याच वेळी, एका गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करता येणार होता. IPO मधील 50 टक्के हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला होता.

कंपनी कुठे वापरणार रक्कम?कंपनी IPO मधून मिळालेली रक्कम तिच्या भांडवली खर्चासाठी, खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरेल. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडची (EMIL) स्थापना पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी एक कंझ्युमर ड्युरेबल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स स्टोअरसोबत मालकी म्हणून केली होती.इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे देशातील 36 शहरांमध्ये 112 स्टोअर्स आहेत.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा,)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक