Join us  

Emcure Pharma IPO Listing : एमक्योर फार्माचं जबरदस्त लिस्टिंग, ३१% प्रीमिअमच्या लिस्टिंगनंतर शेअर्स आणखी वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:48 AM

Emcure Pharma IPO Listing: फार्मा कंपनी एमक्योर फार्माच्या शेअर्सचं आज शेअर बाजारात जबरदस्तलिस्टिंग झालं. लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना मोठा नफा झालाय.

Emcure Pharma IPO Listing: फार्मा कंपनी एमक्योर फार्माच्या शेअर्सचं (Emcure Pharma) आज शेअर बाजारात जबरदस्तलिस्टिंग झालं. कंपनीच्या आयपीओला एकूण ६७ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. आयपीओ अंतर्गत १००८ रुपयांच्या दरानं शेअर्स जारी करण्यात आले होते. आज कंपनीचा शेअर बीएसई आणि एनएसईवर १३२५.०५ रुपयांवर लिस्ट झाले. म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना सुमारे ३१ टक्के लिस्टिंग प्रॉफिट (Emcure Pharma Listing Gain) मिळाला. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये आणखी वाढ झाली. त्यानंतर शेअरला (Emcure Pharma Share Price) बीएसईवर १३६३.०० रुपयांचं अपर सर्किट लागलं. म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदार आता ३५.२२ टक्के नफ्यात आहेत.

IPO ला मिळालेला उत्तम प्रतिसाद

एमक्योर फार्माचा १,९५२.०३ कोटी रुपयांचा आयपीओ ३ ते ५ जुलै दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ६७.८७ पट ओव्हरसब्सक्राइब झाला. यामध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (क्यूआयबी) राखीव हिस्सा १९१.२४ पट, नॉन इन्स्टिट्युशन इनव्हेस्टरचा हिस्सा (एनआयआय) ४९.३२ पट, किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा ७.३६ पट आणि कर्मचाऱ्यांसाठी ८.८१ पट सबस्क्राइब झाला. या आयपीओअंतर्गत ८०० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे १ कोटी १४ लाख २८ हजार ८३९ शेअर्सची विक्री करण्यात आली आहे.

ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रवर्तक सतीश रमणलाल मेहता, सुनील रजनीकांत मेहता, नमिता विकास थापर आणि समित सतीश मेहता तसंच पुष्पा रजनीकांत मेहता, भावना सतीश मेहता, कामिनी सुनील मेहता, बीसी इन्व्हेस्टमेंट IV, अरुणकुमार पुरुषोत्तमलाल खन्ना, बुर्जीस मीनू देसाई आणि सोनाली संजय मेहता यांनी शेअर्सची विक्री केली. नवीन शेअर्स जारी करून उभारलेल्या रकमेपैकी ६०० कोटी रुपये कंपनी कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. मार्च २०२४ अखेर बँकेच्या बॅलन्स शीटमध्ये २,०९१.९ कोटी रुपयांचं कर्ज होतं. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे याचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर लिंक इंटाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड याचे रजिस्ट्रार आहेत.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक