Join us  

गुंतवणुकीसाठी तयार रहा; लवकरच येणार 'या' मोठ्या फार्मा कंपनीचा IPO, सेबीने दिली मंजुरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 3:57 PM

Emcure Pharma IPO Update : नमिता थापर यांच्या एमक्योर फार्माचा IPO बाजारात येणार आहे.

Emcure Pharma IPO : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. बाजारात लवकरच एका नवीन कंपनीची एन्ट्री होणार आहे. शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI) सतीश मेहता यांच्या एमक्योर फार्माला (Emcure Pharma) IPO लॉन्च करण्यास मान्यता दिली आहे. IPO द्वारे 1.36 कोटी शेअर्स विकले जातील आणि त्यातून 800 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.

दोन महिन्यांत IPO येऊ शकतोएमक्योर फार्माने डिसेंबर 2023 मध्ये आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली होती. आता यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर, आता असे मानले जात आहे की, कंपनी पुढील दोन महिन्यांत आयपीओ लॉन्च करू शकते. यानुसार कंपनी आयपीओमध्ये जमा झालेल्या पैशातून कर्जाची परतफेड करेल आणि उर्वरित रक्कम कंपनीच्या इतर कामांवर खर्च केली जाईल. 

बेन कॅपिटल समर्थित Emcure फार्मा ने IPO लॉन्च करण्यासाठी जेपी मॉर्गन, जेफरीज आणि कोटक यांना गुंतवणूक बँक म्हणून नियुक्त केले आहे. बेन कॅपिटलचा कंपनीत 13 टक्के हिस्सा आहे. 

13 वी सर्वात मोठी फार्मा कंपनीशार्क टँक इंडिया फेम नमिता थापर यांचे वडील सतीश मेहता, यांनी 1981 मध्ये 3 लाख रुपयांच्या भांडवलात एम्क्योर फार्माची स्थापना केली होती. ही कंपनी देशातील 13वी सर्वात मोठी फार्मा कंपनी आहे. गेल्या 40 वर्षांत Emcure ने 19 उपकंपन्या स्थापन केल्या. त्यांच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये 500 शास्त्रज्ञ आहेत, तर कंपनीत सुमारे 11,000 कर्मचारी आहेत.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगव्यवसायशेअर बाजारशेअर बाजार