Emerald tyre manufacturers IPO: एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचे शेअर्स (Emerald tyre manufacturers Share Listing)आज शेअर बाजारात लिस्ट झाले. एनएसईवर कंपनीचा शेअर ९०% प्रीमियमसह १८०.५० रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरनं पाच टक्क्यांचा उच्चांकी स्तर गाठला आणि इंट्राडे उच्चांकी स्तर १८९.५० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी १०० टक्क्यांचा मोठा नफा झाला. इश्यूसाठी प्राइस बँड ९० ते ९५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. ५० कोटी रुपयांचा हा आयपीओ जवळपास ५०० पट सब्सक्राइब झाला होता.
अधिक माहिती काय?
तामिळनाडूतील एमराल्ड टायर्सचा आयपीओ ५ ते ९ डिसेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. यावेळी त्याला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एसएमई इश्यू ५३० पट सब्सक्राइब झाला. आयपीओची लॉट साइज १२०० शेअर्सची होती आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आवश्यक किमान गुंतवणूक रक्कम ११४,००० रुपये होती. जीवायआर कॅपिटल अॅडव्हायझर्स एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर लिंक इनटाइम इंडिया आयपीओचे रजिस्ट्रार आहेत. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा आयपीओ हा एसएमई आयपीओ असून कंपनीचे इक्विटी शेअर्स एनएसई एसएमईवर लिस्ट झाले आहेत.
कंपनीचा व्यवसाय काय?
२००२ मध्ये सुरू झालेली ही कंपनी ग्रेकस्टर ब्रँडअंतर्गत टायर तयार करते. यामध्यये फोर्कलिफ्ट, स्किड लोडर, विमानतळ ग्राउंड सपोर्ट उपकरणे, पोर्ट ट्रेलर, शेती अवजारे, लॉन आणि गार्डन मोव्हर्स, खाण उपकरणे, हवाई कार्य प्लॅटफॉर्म ट्रक, बॅकहो लोडरसाठीच्या टायर्सचा समावेश आहे. कंपनी इश्यूतील रकमेचा वापर भांडवली खर्च, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टं आणि प्रस्तावित खर्चासाठी करणार आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)