Lokmat Money >शेअर बाजार > EMS IPO: सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला हा आयपीओ, पैसे कमावण्याची संधी; ग्रे मार्केटचे मजबूत संकेत

EMS IPO: सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला हा आयपीओ, पैसे कमावण्याची संधी; ग्रे मार्केटचे मजबूत संकेत

आयपीओनंतर कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट केले जातील.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 01:46 PM2023-09-08T13:46:42+5:302023-09-08T13:47:55+5:30

आयपीओनंतर कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट केले जातील.

EMS IPO for subscription opportunity to make money Strong indication of gray market details | EMS IPO: सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला हा आयपीओ, पैसे कमावण्याची संधी; ग्रे मार्केटचे मजबूत संकेत

EMS IPO: सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला हा आयपीओ, पैसे कमावण्याची संधी; ग्रे मार्केटचे मजबूत संकेत

EMS IPO: पाणी आणि सांडपाण्याची सेवा पुरवणारी कंपनी ईएमएसचा आयपीओ (EMS IPO) आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. आयपीओ उघडण्यापूर्वी सहा अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीनं 96.37 कोटी रुपये उभारले आहेत. आयपीओतील गुंतवणूकदारांना याचे शेअर्स 211 रुपये किमतीने जारी केले आहेत. आता ग्रे मार्केटबद्दल बोलायचं झालं तर त्याचे शेअर्स 125 रुपये म्हणजेच 59.24 टक्के जीएमपीवर (ग्रे मार्केट प्रीमियम) उपलब्ध आहेत. मात्र, बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमधून मिळणाऱ्या संकेतांऐवजी कंपनीच्या मूलभूत गोष्टी आणि आर्थिक बाबी लक्षात घेऊन गुंतवणुकीचे निर्णय घेतले पाहिजेत.

आयपीओनंतर कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट केले जातील. आता अँकर गुंतवणूकदारांबद्दल बोलायचं झालं तर एनएव्ही कॅपिटल व्हीसीसी-एनएव्ही कॅपिटल इमर्जिंग स्टार फंड, अॅबॅकस डायव्हर्सिफाइड अल्फा फंड, सेंट कॅपिटल फंड, मेरू इन्व्हेस्टमेंट फंड पीसीसी-सेल 1, बोफा सिक्युरिटीज युरोप, मॉर्गन स्टॅनले एशिया (सिंगापूर) यांनी यामध्ये पैसे गुंतवले आहेत.

IPO चे डिटेल्स
हा आयपीओ 12 सप्टेंबरपर्यंत खुला राहील. यामध्ये 70 शेअर्सच्या लॉटसाठी 200-211 रुपयांच्या प्राइस बँड निश्चित करण्यात आलाय. इश्यूचा अर्धा हिस्सा क्वालिफाईड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIB), 15 टक्के नॉन इंस्टीट्यूशनल इनव्हेस्टर्स (NII) आणि 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित ठेवण्यात आलाय. आयपीओनंतर 15 सप्टेंबरला शेअर्सचं अलॉटमेंट अंतिम केलं जाईल. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी कंपनीची मार्केटमध्ये एन्ट्री होईल. इश्यूचे रजिस्ट्रार केफिन टेक आहेत. या आयपीओ अंतर्गत कंपनी 146.24 कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करेल.

ही कंपनी 2012 मध्ये सुरू करण्यात आली. पूर्वी या कंपनीचं नाव ईएमएस इन्फ्राकॉन असं होतं. हे वॉटर प्लांट, सांडपाणी प्रक्रिया इत्यादीशी संबंधित सेवा प्रदान करते. गेल्या तीन आर्थिक वर्षांत कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत दिसून आलीये.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: EMS IPO for subscription opportunity to make money Strong indication of gray market details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.