Join us  

Teslaशी जोडलं या एनर्जी कंपनीचं नाव, गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या; २० टक्क्यांचं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 3:50 PM

कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं.

Upper Circuit Stock Today: पॅनासॉनिर एनर्जी इंडिया लिमिटेडच्या (Panasonic Energy India Ltd) शेअर्समध्ये सोमवारी मोठी तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअर्सना सोमवारी अपर सर्किट लागलं. पॅनासॉनिक एनर्जीच्या शेअर्समध्ये सोमवारी २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचे शेअर्स सोमवारी ३५६.४५ रुपयांवर पोहोचले.

एका वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी दिसून आली. इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या टॉप बॅटरी सप्लायर्सपैकी एक पॅनासॉनिक एनर्जीनं भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यासाटी मोदी सरकारशी संपर्क केला. हे वृत्त अशावेळी समोर आलं आहे जेव्हा टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारतीय बाजारात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती.

कंपनी एसीसी बॅटरी स्टोरेजसाठी सरकारच्या पीएलआय योजनेंतर्गत भारतात बॅटरी उत्पादन प्रकल्प सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीच्या उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडळानं गेल्या महिन्यात सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचं वृत्त ईटीनं दिलं आहे. दरम्यान, नीति आयोगाचे सीईओ आणि जी २० शेरपा अमिताभ कांत आणि हेवी इंडस्ट्रीज सेक्रेटरी कामरान रिझवी यांनी पॅनासॉनिकच्या अन्य जपानी टीमच्या सदस्यांसोबत पॅनासॉनिक एनर्जी ग्लोबल प्रेसिंडेंट आणि सीईओ Kazuo Tadanobu यांची भेट घेतली. यावेळी पॅनासॉनिक लाइफ सोल्युशन्सचे भारताचे अध्यक्ष मनिष शर्मा उपस्थित होते.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरशेअर बाजार