सोलार सिस्टिमचे उत्पादन आणि इंस्टालेशन करणारी कंपनी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने केवळ 5 वर्षांतच एक लाख रुपयांचे तब्बल ₹6.1 कोटीहून अधिक केले आहेत. या शेअरने, या कालावधीत 61804 टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. 28 जून 2019 रोजी हा शेअर केवळ 3.15 रुपयांवर होता. तो आज 1950 रुपयांवर ट्रेड करत आहे.
सहा महिन्यांत 433 टक्क्यांचा परतावा -
वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज केवळ एका वर्षातच 769 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. अर्थात केवळ एका वर्षातच या शेअरने एक लाख रुपयांचे जवळपास 7.70 लाख रुपये केले आहेत. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, या शेअरने 342 टक्क्यांचा परतावा देत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
अशी आहे आजची स्थिती -
आज हा शेअर 2024 रुपयांवर खुला झाला आणि 2030 रुपयांवर पोहोचला. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3037.75 रुपये तर नीचांक 213.01 रुपये एवढा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप केवल 20.45 हजार कोटी रुपये एवढे आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)