Join us

एनर्जी शेअरनं रचला इतिहास, १२ वर्षांच्या विक्रमी स्तरावर; एक्सपर्ट म्हणाले ₹६० वर जाणार भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 12:47 PM

कंपनीच्या शेअर्सनं नवीन विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीचा शेअर आज कामकाजादरम्यान बीएसईवर 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला.

Suzlon Energy Share: सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सने शुक्रवारी कामकाजादरम्यान इतिहास रचला. कंपनीच्या शेअर्सनं नवीन विक्रमी उच्चांक गाठला. भारतीय रिन्युएबल ऊर्जा कंपनी सुझलॉनचा शेअर आज कामकाजादरम्यान बीएसईवर 50.72 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. 

गेल्या काही सेशन्समध्ये सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली होती. याआधी गुरुवारी, अर्थसंकल्पाच्या दिवशीही या शेअरला 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. आज, प्रथमच, सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनं  ₹50 ची पातळी ओलांडली आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे ​​शेअर्स आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान 12 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. सुझलॉन एनर्जीचा शेअर अखेरचा 5 ऑगस्ट 2011 रोजी 50 रुपयांच्या इंट्राडे पातळीवर पोहोचला होता. त्यावेळी तो बीएसईवर 50.25 वर पोहोचला होता. 

सरकारच्या या योजनाचा फायदा 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी मदत प्रस्तावित केली आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल. यामुळे प्रत्येक कुटुंबाची वर्षभरात 18 हजार रुपयांची बचत होणार असल्याचंही त्यांनी भाषणादरम्यान सांगितलं. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत, एक कोटी कुटुंबांना सौर पॅनेलद्वारे दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. यामुळे सौर ऊर्जा कंपनीला फायदा होऊ शकतो आणि त्याचा स्टॉकवर परिणाम होऊ शकतो. 

काय म्हणाले तज्ज्ञ? 

चार्ट पॅटनवर सुझलॉन शेअर्सची किंमत सकारात्मक दिसत आहे, त्यांनी स्टॉप लॉस कायम ठेवत शेअर आपल्याकडे ठेवावे. कमी कालावधीमध्ये हे शेअर्स 55 ते 60 रुपये प्रति शेअरच्या स्तरावर जाऊ शकतात अशी प्रतिक्रिया चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी दिली. जेएम फायनान्शिअलनं या शेअरवर 54 रुपयांचं टार्गेट प्राईज कायम ठेवलं आहे. कंपनीच्या शेअरमध्ये YTD मध्ये आतापर्यंत 40 टक्के आणि एका वर्षात 450 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांचा सल्ला हा त्यांचा वैयक्तिक सल्ला आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजार