Join us  

एनर्जी स्टॉक Waaree Renewable मध्ये लागलं अपर सर्किट; यामागे मोठं कारण, वर्षभरात ७००% रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 4:26 PM

Waaree Renewable Technology Share Price : एनर्जी स्टॉक वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीच्या शेअरला मंगळवारी ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं असून शेअरची किंमत १,९९० रुपयांच्या पातळीवर पोहोचली.

Waaree Renewable Technology Share Price : एनर्जी स्टॉक वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीच्या शेअरला मंगळवारी ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं असून शेअरची किंमत १,९९० रुपयांच्या पातळीवर पोहोचली. हा शेअर सातत्यानं गुंतवणूकदारांच्या रडारवर असून गेल्या काही काळापासून या कंपनीच्या शेअर्सची कामगिरी उत्तम राहिली आहे. गेल्या पाच दिवसात कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना २२ टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. 'वारी एनर्जीज' या मूळ कंपनीच्या आयपीओला मंजुरी मिळाल्यानंतर मंगळवारी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 

आयपीओच्या मंजुरीनंतर तेजी

सोलर पीबी मॉल्यूल्स बनवणाऱ्या वारी एनर्जीज या कंपनीनं सोमवारी, बाजार नियामक सेबीनं आयपीओसाठी मंजुरी दिली असल्याचं म्हटलं. कंपनी ३,००० कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स नव्यानं जारी करणार असून प्रत्येकी १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या ३,२००,००० इक्विटी शेअर्सची विक्री पब्लिक ऑफरद्वारे करणार आहे.

रनिंग लीड मॅनेजर कोण?

नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि आयटीआय कॅपिटल लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

वर्षभरात ७०० टक्के परतावा

वारी रिन्युएबलनं आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या ६ महिन्यांत ४१ टक्के नफा दिला आहे, तर एका वर्षाच्या कालावधीत ७०० टक्के परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षांच्या परताव्याबद्दल बोलायचे झाले तर तो २,१०० टक्क्यांहून अधिक आहे, तर तीन वर्षांत ते ६,००० टक्क्यांहून अधिक आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंगसेबी