Lokmat Money >शेअर बाजार > इंजिनिअरिंग कंपनीला सौदीहून ₹24000 कोटींची ऑर्डर, ₹124 ने वधराला शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

इंजिनिअरिंग कंपनीला सौदीहून ₹24000 कोटींची ऑर्डर, ₹124 ने वधराला शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

कंपनीचा शेअर आज गुरुवारी ट्रेडिंगदरम्यान 4.55% अर्थात 124.35 रुपयांनी वधारून 2854.95 रुपयांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 10:49 PM2023-09-07T22:49:42+5:302023-09-07T22:50:55+5:30

कंपनीचा शेअर आज गुरुवारी ट्रेडिंगदरम्यान 4.55% अर्थात 124.35 रुपयांनी वधारून 2854.95 रुपयांवर पोहोचला.

Engineering company L&T gets rs24,000 crore order from Saudi, shares up by rs124 | इंजिनिअरिंग कंपनीला सौदीहून ₹24000 कोटींची ऑर्डर, ₹124 ने वधराला शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

इंजिनिअरिंग कंपनीला सौदीहून ₹24000 कोटींची ऑर्डर, ₹124 ने वधराला शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

लार्सन अँड टुब्रो अर्थात L&T लिमिटेडला एक मोठी आर्मको ऑर्डर मिळाली आहे. यासंदर्भात MEED ने 7 सप्टेंबरला दिलेल्या माहितीनुसार, L&T ला सौदी अरामकोच्या जाफुराह अपारंपरिक गॅस प्रोडक्शन प्रकल्पाच्या, दुसऱ्या विस्तार टप्प्याच्या भागाच्या स्वरुपात दोन इंजिनिअरिंग, खरेदी आणि बांधकाम (EPC) ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनीचा शेअर आज गुरुवारी ट्रेडिंगदरम्यान 4.55% अर्थात 124.35 रुपयांनी वधारून 2854.95 रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे.

24,000 कोटी रुपयांची ऑर्डर -
माध्यमांतील वृत्तांनुसार, सौदी अरामकोच्या जाफुराह अपारंपरिक गॅस प्रोडक्शन पकल्पाची ऑर्डर जवळपास 24,000 कोटी रुपयांची आहे. तर दुसरी ऑर्डर कंस्ट्रक्टिंग गॅस कॉम्प्रेशनच्या निर्मितीसाठी आहे. याची किंमत 1 बिलियन डॉलर (83.2 अब्ज रुपये) आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, L&T या प्रकल्पासाठी गॅस प्रोसेसिंग प्लांट आणि मुख्य प्रक्रिया युनिट विकसित करेल. सौदी अरामकोने पूर्वेकडील प्रांतात 110 अब्ज डॉलरच्या जाफुराह गॅस प्रकल्पाची योजना तयार केली आहे. कंपनीने 1,000 ते 2,500 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी महत्वपूर्ण ऑर्डरच्या स्वरुपात क्लासिफाय केले आहे. तर 2,500 ते 5,000 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मोठे प्रकल्प म्हणून क्लासिफाय केले आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

 

Web Title: Engineering company L&T gets rs24,000 crore order from Saudi, shares up by rs124

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.