Lokmat Money >शेअर बाजार > सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आजवर मल्टीबॅगर परतावा दिला आहे. साधारणपणे वर्षभरात ८०-१०० टक्के परतावा हा मल्टिबॅगर परतावा मानला जाऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 01:56 PM2024-09-30T13:56:47+5:302024-09-30T13:57:00+5:30

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आजवर मल्टीबॅगर परतावा दिला आहे. साधारणपणे वर्षभरात ८०-१०० टक्के परतावा हा मल्टिबॅगर परतावा मानला जाऊ शकतो.

Eraaya Lifespaces Ltd rs 33 crosses rs 2600 for 24th straight day Upper Circuit No one will sell shares | सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आजवर मल्टीबॅगर परतावा दिला आहे. साधारणपणे वर्षभरात ८०-१०० टक्के परतावा हा मल्टिबॅगर परतावा मानला जाऊ शकतो. गुंतवलेले भांडवल दुप्पट करण्यासाठी हा परतावा पुरेसा आहे, पण काही शेअर्स असे आहेत जे गुंतवणूकदारांना एखाद्या स्वप्नाप्रमाणेच परतावा देत आहेत. एक शेअर असाही आहे जो सातत्यानं अपर सर्किटला धडकत असून त्यानं गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना ७५ हजार टक्के परतावा दिलाय. इराया लाइफस्पेसेस (Eraaya Lifespaces Ltd) असं या शेअरचं नाव आहे.

इराया लाइफस्पेस लिमिटेडच्या शेअरची किंमत सातत्यानं वाढत असून गेल्या वर्षभरात शेअरची किंमत ३३ रुपयांवरून २६३५.६५ रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या २४ दिवसांपासून या शेअरमध्ये अपर सर्किट लागलंय. सोमवारी हा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २६३५.६५ रुपयांच्या पातळीवर आला. या कंपनीचं मार्केट कॅप ३.१२ हजार कोटी रुपये आहे.

कशी आहे कंपनीची स्थिती?

या शेअरची वाढ पाहिली तर गेल्या ३ वर्षांचा शेअर प्राइस सीएजीआर ५२० टक्के असून तो कर्जमुक्त होण्याच्या स्थितीत आहे. तिमाही निकालानुसार, कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत २ कोटी रुपयांची निव्वळ विक्री नोंदविली आणि वित्त वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा १,८८७.५ टक्क्यांनी वाढून ०.९५ कोटी रुपये झाला, तर आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ०.०५ कोटी रुपये होता.

इराया लाइफस्पेस लिमिटेडने रॉबिन रैनाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची व्यापक चौकशी सुरू केली आहे.
वार्षिक निकालात निव्वळ विक्री आर्थिक वर्ष २०२३ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १,५२,३११ टक्क्यांनी वाढून २९७.२० कोटी रुपये झाली असून निव्वळ नफा ३४१.६ टक्क्यांनी वाढून ०.३४ कोटी रुपये झालाय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Eraaya Lifespaces Ltd rs 33 crosses rs 2600 for 24th straight day Upper Circuit No one will sell shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.