Lokmat Money >शेअर बाजार > Esprit Stones IPO : Esprit Stonesचा IPO आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; पाहा प्राईज बँड, जीएमपीसह डिटेल्स  

Esprit Stones IPO : Esprit Stonesचा IPO आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; पाहा प्राईज बँड, जीएमपीसह डिटेल्स  

Esprit Stones IPO : एस्प्रिट स्टोन्सचा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला झालाय. यात किती आणि कधीपर्यंत गुंतवणूक करता येईल याची माहिती जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 01:06 PM2024-07-26T13:06:24+5:302024-07-26T13:06:55+5:30

Esprit Stones IPO : एस्प्रिट स्टोन्सचा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला झालाय. यात किती आणि कधीपर्यंत गुंतवणूक करता येईल याची माहिती जाणून घेऊ.

Esprit Stones IPO opens for investment from today See Price Band Details with GMP | Esprit Stones IPO : Esprit Stonesचा IPO आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; पाहा प्राईज बँड, जीएमपीसह डिटेल्स  

Esprit Stones IPO : Esprit Stonesचा IPO आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; पाहा प्राईज बँड, जीएमपीसह डिटेल्स  

Esprit Stones IPO : एस्प्रिट स्टोन्सचा आयपीओ (Esprit Stones IPO) हा ५०.४२ कोटी रुपयांचा बुक बिल्ट इश्यू असून तो २६ जुलै रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. एस्प्रिट स्टोन्स लिमिटेडबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.

Esprit Stones Limited ची माहिती

या कंपनीची सुरुवात २०१६ मध्ये झाली असून ती इंजिनिअरिंग क्वार्ट्झ आणि मार्बल सर्फेसचं काम करते. मार्च 2024 पर्यंत, एक उत्पादन सुविधा, तीन प्रेसिंग लाइन्स आणि दोन पॉलिशिंग लाइन्ससह सुसज्ज आहे, ज्याची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे ७२ लाख चौरस फूट आहे. मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी दोन वर क्वार्ट्झ ग्रिट आणि क्वार्ट्झ पावडरचं उत्पादन केलं जातं आणि तिसऱ्या फॅसिलिटीवर कंपनी अनसॅच्युरेटेड पॉलिस्टर रेझिनची निर्मिती करते. 

काय आहे प्राईज बँड?

Esprit Stones IPO चा प्राईज बँड ८२-८७ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. यामध्ये एक लॉट साईज १६०० शेअर्सची असून गुंतवणूकदारांना किमान १ लाख ३९ हजार २०० रूपयांची गुंतवणूक करावी लागेल.

आयपीओची इश्यू साईज काय?

हा आयपीओ ५०.४२ कोटी रुपयांचा एक बुक बिल्ट इश्यू आहे. यामध्ये ५७.९५ लाख नवे शेअर्स जारी केले जातील.  कंपनीचे प्रवर्तक सुनीलकुमार लुणावत, नितीन गट्टानी, प्रदीपकुमार लुणावथ, संगीता गट्टानी, अनुश्री लुनावथ आणि सिद्धांत लुणावथ आहेत. आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी ५० टक्के, नॉन इन्स्टिट्युशन इनव्हेस्टर्ससाठी १५ आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के गिस्सा राखीव ठेवण्यात आलाय.

यामध्ये तुम्हाला २६ जुलै ते ३० जुलै दरम्यान गुंतवणूक करता येईल. तसंच ३१ तारखेला शेअर्स अलॉट होण्याची आणि १ ऑगस्टला ते डिमॅट खात्यात क्रेडिट होण्याची शक्यता आहे. २ ऑगस्ट रोजी शेअर्स बाजारात लिस्ट होऊ शकतात. शेअर बाजार विश्लेषकांच्या मते, अनलिस्टेड मार्केटमध्ये एस्प्रिट स्टोन्सचा आयपीओ जीएमपी ३८ रुपये असून तो कॅप प्राइसपेक्षा ४३.६% जास्त आहे.

(टीप : यामध्ये आयपीओबाबत सामन्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Esprit Stones IPO opens for investment from today See Price Band Details with GMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.