Lokmat Money >शेअर बाजार > लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी... 

लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी... 

कंपनीचे शेअर्स एनएसईवर लिस्ट झाले होते. ९० रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडच्या तुलनेत ५.५६ टक्क्यांच्या डिस्काऊंटमध्ये हे शेअर्स ८५ रुपयांवर लिस्ट झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:59 AM2024-09-19T11:59:37+5:302024-09-19T11:59:54+5:30

कंपनीचे शेअर्स एनएसईवर लिस्ट झाले होते. ९० रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडच्या तुलनेत ५.५६ टक्क्यांच्या डिस्काऊंटमध्ये हे शेअर्स ८५ रुपयांवर लिस्ट झाले.

Excellent Wires and Packaging share fell below the IPO price as soon as it was listed investors selling price hits rs 82 | लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी... 

लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी... 

Excellent Wires and Packaging: एक्सिलेंट वायर्स आणि पॅकेजिंगचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे शेअर्स एनएसईवर लिस्ट झाले होते. एक्सिलेंट वायर्स आणि पॅकेजिंगचे शेअर्स डिस्काऊंटेड प्राईजमध्ये लिस्ट आहेत. ९० रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडच्या तुलनेत ५.५६ टक्क्यांच्या डिस्काऊंटमध्ये हे शेअर्स ८५ रुपयांवर लिस्ट झाले. कामकाजादरम्यान त्यात आणखी घसरण दिसून आली आणि शेअर ८२ रुपयांवर पोहोचला.

काय आहेत डिटेल्स?

एक्सीलंट वायर्स अँड पॅकेजिंगचा आयपीओ ११ सप्टेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि १३ सप्टेंबर रोजी बंद झाला. यासाठी कंपनीने ९० रुपये प्राइस बँड निश्चित केला होता. आयपीओचा आकार १२.६० कोटी रुपये होता आणि त्यात १४ लाख शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा समावेश होता. दरम्यान, या इश्यूवर गुंतवणूकदार फारसे उत्सुक नव्हते. 

तीन दिवसांत केवळ २० पट आयपीओ सब्सक्राइब करण्यात आला. किरकोळ गुंतवणूकदार सर्वात अॅक्टिव्ह होते. या हिस्सा ३५ पट अधिक सबस्क्राइब झाला होता. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा राखीव हिस्स्याच्या ८ पट अधिक खरेदी केली आणि क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सनं हा इश्यू सबस्क्राइब केला नाही.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Excellent Wires and Packaging share fell below the IPO price as soon as it was listed investors selling price hits rs 82

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.