Lokmat Money >शेअर बाजार > Ram Mandir उभारणाऱ्या कंपनीच्या शेअरवर एक्सपर्ट बुलिश; ₹४४०० पर्यंत जाणार भाव, म्हणाले...

Ram Mandir उभारणाऱ्या कंपनीच्या शेअरवर एक्सपर्ट बुलिश; ₹४४०० पर्यंत जाणार भाव, म्हणाले...

आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 01:05 PM2024-01-22T13:05:08+5:302024-01-22T13:05:26+5:30

आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

Experts Bullish on Shares of Ram Mandir Construction Company Larsen and Toubro l and t The price will go up to rs 4400 expert bullish | Ram Mandir उभारणाऱ्या कंपनीच्या शेअरवर एक्सपर्ट बुलिश; ₹४४०० पर्यंत जाणार भाव, म्हणाले...

Ram Mandir उभारणाऱ्या कंपनीच्या शेअरवर एक्सपर्ट बुलिश; ₹४४०० पर्यंत जाणार भाव, म्हणाले...

Larsen and Toubro share Price: वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आणि अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर तयार झालं आहे. आज मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवर या सोहळ्यात सहभागी झाले होते. यानंतर एक दिवस मंदिर जनतेसाठी खुलं केलं जाणार आहे. दरम्यान, डिझाईन इंजिनिअरिंग आणि निर्माण समूह लार्सन अँड टुब्रोनं (L&T) एक निवेदन जारी केलं आहे.

कंपनीनं एका निवेदनात म्हटलंय की, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या आदेशानुसार, लार्सन अँड टुब्रोनं श्री रामजन्मभूमी मंदिराचं डिझाइन आणि बांधकाम यशस्वीरित्या पार पाडलं. मंदिर हे स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रातील एक मोठं यश आहे. हे मंदिर ७० एकर परिसरात पसरलेलं आहे. त्याची रचना प्राचीन नागार वास्तुशैलीपासून प्रेरित आहे. मंदिराची उंची १६१.७५ फूट, लांबी ३८० फूट आणि रुंदी २४९.५ फूट आहे. कंपनीनं रविवारी ही माहिती दिली. दरम्यान, यानंतर बाजार तज्ञांच्या मते, कंपनीचे शेअर्स येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे आणि त्याची किंमत ₹ ४४०० पर्यंत जाऊ शकते.

काय म्हटलं कंपनीनं?

'श्री रामजन्मभूमी मंदिराची रचना आणि उभारणीची आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो,' अशी प्रतिक्रिया एल अँड टीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) एसएन सुब्रमण्यन म्हणाले. एल अँड टी ही भारतातील २३ अब्ज डॉलरची मल्टीनॅशनल कंपनी आहे. ही इंजिनिअरिंग, खरेदी आणि बांधकाम (EPC) प्रकल्प, उच्च-तंत्र उत्पादन आणि सेवांमध्ये कार्यरत आहे. कंपनीचा व्यवसाय जगातील ५० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे.

काय म्हटलंय तज्ज्ञांनी?

युएसबीनं ₹४,४०० च्या टार्गेट प्राईजसह स्टॉकवर खरेदीची शिफारस केली आहे. एलारा कॅपिटलनं या स्टॉकवर ₹३,७५० च्या टार्गेट प्राईजसह खरेदीची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधर म्हणाले की, स्टॉक दीर्घकालीन मजबूत स्थितीत राहील. दीर्घकालीन टाइम फ्रेम चार्ट ट्रेंड-आधारित फिबोनाची एक्स्टेंशन टूलनुसार, स्टॉक ₹४,३४०-४,४४० च्या स्तरापेक्षा वर जाऊ शकतो.

(टीप - यामध्ये देण्यात आलेली मतं तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Experts Bullish on Shares of Ram Mandir Construction Company Larsen and Toubro l and t The price will go up to rs 4400 expert bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.