Join us  

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरुच; कोल इंडियामध्ये तेजी, आयसीआयसीआय बँक घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 9:37 AM

शेअर बाजारातील कामकाज गुरुवारी घसरणीनं सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 105 अंकांनी घसरून 72651 अंकांच्या पातळीवर उघडला.

Stock Market Open: शेअर बाजारातील कामकाज गुरुवारी घसरणीनं सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 105 अंकांनी घसरून 72651 अंकांच्या पातळीवर उघडला तर निफ्टी 52 अंकांनी घसरून 21945 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिड कॅप, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्समध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली जात होती. निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण दिसून आली. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात कोल इंडिया लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदाल्को, भारती एअरटेल, महिंद्रा, इन्फोसिसआणि बीपीसीएल या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. जर आपण शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात नुकसान झालेल्या कंपन्यांबद्दल बोललो तर यामध्ये बजाज फायनान्स, बजाज ऑटो, एचडीएफसी लाईफ, टाटा स्टील, एसबीआय लाइफ, एनटीपीसी आणि डॉक्टर रेड्डीज लॅबच्या शेअर्सचा समावेश होता. 

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार निफ्टी 22000 च्या पातळीच्या खाली आल्यानं गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. सेबी प्रमुखांनी स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्सच्या वाढत्या मूल्यांकनावर चिंता व्यक्त केली होती, आता निफ्टीच्या स्मॉल कॅप निर्देशांकावर आणि निफ्टीच्या सपोर्ट लेव्हलकडे लक्ष आहे. 

गुरुवारी, प्री ओपनिंग व्यवसायात बीएसई सेन्सेक्स 326 अंकांनी घसरला आणि 72435 अंकांच्या पातळीवर उघडला. तर निफ्टी 26 अंकांच्या वाढीसह 22023 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारातील कामकाज घसणीसह सुरू होऊ शकतं असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते.

टॅग्स :शेअर बाजार