Lokmat Money >शेअर बाजार > ₹167 वर पोहोचणार हा शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत 4.83 कोटी शेअर्स!

₹167 वर पोहोचणार हा शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत 4.83 कोटी शेअर्स!

जवळपास 44 एक्सपर्ट्स पैकी बहुतेकांनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची सरासही टार्गेट प्राइस 167 रुपये एवढी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 08:49 PM2023-06-25T20:49:39+5:302023-06-25T20:50:00+5:30

जवळपास 44 एक्सपर्ट्स पैकी बहुतेकांनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची सरासही टार्गेट प्राइस 167 रुपये एवढी आहे. 

federal bank share may reach rs 167, Rekha Jhunjhunwala has 4.83 crore shares | ₹167 वर पोहोचणार हा शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत 4.83 कोटी शेअर्स!

₹167 वर पोहोचणार हा शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत 4.83 कोटी शेअर्स!

खासगी क्षेत्रातील फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये (Federal Bank) गेल्या शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. मात्र असे असले तरी या शेअरसंदर्भात एक्सपर्ट बुलिश दिसत आहेत. जवळपास 44 एक्सपर्ट्स पैकी बहुतेकांनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची सरासही टार्गेट प्राइस 167 रुपये एवढी आहे. 

सध्याच्या किंमतीनुसार या शेअरमध्ये 37 टक्क्यांपर्यंतची तेजी येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्वाचे म्हणजे, या कंपनीत रेखा झुनझुनवाला यांचा वाटा 2.31 टक्के एवढा आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये फेडरल बँकेचे तब्बल 4,82,13,440 एवढे शेअर आहेत.

काय आहे शेअरची किंमत -
फेडरल बँकेच्या शेअरची किंमत शुक्रवारी बीएसई इंडेक्सवर 122.15 रुपये होती. ती 23 जून 2022 रोजी 85.60 रुपयांवर होती. ही या शेअरची 52 आठवड्यांतील निचांकी पातळी आहे. जानेवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 143.35 रुपये होती. हा शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) फेडरल बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून हर्ष दुगर यांच्या नियुक्तीला नुकतीच मान्यता दिली आहे. 23 जून 2023 ते 23 जून 2026 असा दुगर यांचा कार्यकाळ असेल. ते एप्रिल 2021 पासून फेडरल बँकेत ग्रुप प्रेसिडेंट आणि होलसेल बँकिंग प्रमुख होते. दुगर यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये बँक जॉईन केली होती. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: federal bank share may reach rs 167, Rekha Jhunjhunwala has 4.83 crore shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.