Join us  

फसवाल तर आता खैर नाही, फिनफ्लुएन्सर्स कमवातयत कोट्यवधी; SEBI उचलणार मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 10:48 AM

फायनान्शिअल इन्फ्लुएनर्स सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठई ७.५ लाख रुपयांपर्यंत घेत असल्याची माहिती समोर आलीये.

देशात सध्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग ट्रेडिंगच्या दिशेनं जात आहे. कोरोना महासाथीच्या नंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. तरुणांची वाढती संख्या पाहता सोशल मीडियावर फिनफ्लुएन्सर्स किंवा फायनान्शिअल इन्फ्लुएनर्सची संख्या वाढत आहे. सोशल मीडियावर असे सल्ले देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीये. यापैकी बहुतांश लोकांकडे कोणत्याही प्रकारची डिग्रीही नाही. आता एक नवा ट्रेंड समोर आलाय. यापैकी अनेक फायनान्स इन्फ्लुएनर्स स्वत: ट्रेडिंगमध्ये मोठं नुकसान सोसल्यानंतर ते कव्हर करण्यासाठी तरुणांना फ्युचर अँड ऑप्शनचे कोर्स विकून पैसे घेत आहेत. सेबीनं आता या फिनफ्लुएनर्सवर अंकुश लावण्याची तयारी करत आहे.

गुंतवणूकदारांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी बाजार नियामक सेबी आता या फायनान्शिअल इन्फ्लुएनर्सवर अंकुश लावण्याच्या तयारीत आहे. हे इन्फ्लुएनर्स डिजिटल मीडिया, चॅनल्स यांच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूकीचा सल्ला देतात. फायनान्शिअल इन्फ्लुएनर्स सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठई ७.५ लाख रुपयांपर्यंत घेतात आणि लोकांना आपलं मत सांगून आर्थिक निर्णय घेण्यास प्रभावित करतात अशी माहिती समोर आली आहे. 

करावी लागणार नोंदणीपरंतु आता त्यांना नियामकाच्या नियमांतर्गत यावं लागणार आहे. सेबीनं यांची वाढती संख्या पाहता त्यांच्यावर नियंत्रण आणण्याची तयारी केली आहे. सेबीचं हे प्रस्तावित पाऊल गुंतवणूकदारांना योग्य निष्पक्ष माहिती मिळेल याची खात्री देतं. यामुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक धोक्यांपासून बचाव होणार असल्याची प्रतिक्रिया, आनंद राठी वेल्थचे सीईओ फिरोज अझिझ यांनी पीटीआय भाषाशी बोलताना दिली. या प्रस्तावाअंतर्गत इन्फ्लुएनर्सना सेबीकडे आपली नोंदणी करावी लागेल आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं लागेल. याशिवाय म्युच्युअल फंड्स आणि शेअर ब्रोकर्ससोबत भागीदारी करण्यावरही निर्बंध घालण्याचा प्रस्ताव आहे.

टॅग्स :सेबीसोशल मीडियाशेअर बाजार