Fineotex Chemical shares: गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात दमदार कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये फिनोटेक्स केमिकल (Fineotex Chemical) या कंपनीचेही नाव सामील आहे. गेल्या 5 वर्षांत कंपनीचा शेअर 33.75 रुपयांवरुन 400 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच या काळात कंपनीच्या शेअरने सूमारे 1000 टक्क्यांचा परतावा दिलाय. आता कंपनीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
सलग 4 सत्रांपासून कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली होती, मात्र नंतर प्रॉफिट बुकिंगमुळे यात घसरण झाली. अशातच, कंपनीने सोमवारी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, निधी मिळवण्यासाठी बोर्डाची बैठक झाली. यामध्ये शेअर्स वितरन करुन निधी उभारण्यास मान्यात मिळाली आहे.
आशिष कचौलिया यांच्याकडे कंपनीचे शेअर्स
विशेष म्हणजे, दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचौलिया यांच्याकडे फिनोटेक्स केमिकल लिमिटेडमध्ये डिसेंबर तिमाहीपर्यंत 31,35,568 शेअर्स होते. म्हणजेच कंपनीतील त्यांची एकूण हिस्सेदारी 2.83 टक्के होती. सप्टेंबर तिमाही ते डिसेंबर तिमाहीपर्यंत शेअर होल्डिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
(टीप-हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)