Join us  

फर्स्टक्राय IPO ची दमदार लिस्टिंग; सचिन तेंडुलकर अन् रतन टाटांनी कोट्यवधी रुपये कमावले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 7:16 PM

FirstCry ची मूळ कंपनी Brainbee Solutions चा IPO 40 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला आहे.

FirstCry IPO: फर्स्टक्रायची (FirstCry) मूळ कंपनी ब्रेनबी सोल्युशन्सच्या (Brainbee Solutions) IPO ने दमदार कामगिरी केली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर IPO 651 रुपयांच्या किमतीवर लिस्ट झाला. हा 465 रुपयांच्या इश्यू किमतीच्या 40 टक्के अधिक किमतीवर लिस्ट झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. कंपनीच्या मोठ्या गुंतवणूकदारांपैकी सचिन तेंडुलकर आणि रतन टाटा यांनीही यातून मोठा नफा कमावला आहे.

सचिन आणि अंजली तेंडुलकर यांची 10 कोटींची गुंतवणूक FirstCry IPO च्या ग्रे मार्केटला किंमत (GMP) पाहता, हा सुमारे 20 टक्के प्रीमियमवर लिस्ट होणे अपेक्षित होते. पण, याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या IPO मधून सचिन तेंडुलकरला अंदाजे 3.35 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. सचिन आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीत 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनी 487.44 रुपयांना 2 लाखांहून अधिक शेअर्स घेतले होते. आता लिस्टिंग किंमतीनुसार त्यांची गुंतवणूक 13.35 कोटी रुपये झाली आहे.

रतन टाटांची 66 लाखांची गुंतवणूक 5 कोटींवर पोहोचलीदरम्यान, दिग्गद उद्योगपती रतन टाटा यांनी 2016 मध्ये कंपनीचे 77,900 इक्विटी शेअर्स 84.72 रुपये दराने खरेदी केले होते. फर्स्टक्रायमध्ये त्यांनी 66 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. कंपनीच्या लिस्टिंगनंतर त्यांच्या शेअर्सची किंमत आता 5 कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच, त्यांना 670 टक्के नफा झाला आहे. FirstCry ची मूळ कंपनी Brainbee Solutions ने IPO द्वारे शेअर बाजारातून 4194 कोटी रुपये उभे केले आहेत. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजाररतन टाटासचिन तेंडुलकर