Join us  

पैसे तयार ठेवा! २२ नोव्हेंबरला ओपन होणार 'हा' IPO, त्यापूर्वी पाहा प्राईज बँडसह सर्व महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 11:31 AM

जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

Flair Writing IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. एका कंपनीचा आयपीओ (IPO) २२ नोव्हेंबर रोजी उघडणार आहे. हा आयपीओ फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज लिमिटेडचा आहे. कंपनीचा आयपीओ २२ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. तर २४ नोव्हेंबर ही सबस्क्रिप्शनची अंतिम तारीख असेल. अँकर इन्व्हेस्टर्ससाठी २१ नोव्हेंबर रोजी वाटप होईल.प्राईज बँडकंपनीनं आयपीओसाठी प्राईज बँड २८८ रुपये ते ३०४ रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केला आहे. शेअरची फेस व्हॅल्यू पाच रुपये आहे. आयपीओ अंतर्गत २९२ कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, कंपनीच्या प्रवर्तक आणि प्रवर्तक समूह संस्थांद्वारे ३०१ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. सध्या, प्रमोटर्स आणि प्रमोटर्स ग्रुप एंटिटीकडे कंपनीत १०० टक्के भागीदारी आहे.या दिवशी होणार लिस्टिंगफ्लेअर आयपीओच्या एका लॉटमध्ये ४९ इक्विटी शेअर्सचा समावेश असेल. त्यानंतर गुंतवणूकदार ४९ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतील. ३० तारखेला शेअर्सचं वाटप केलं जाईल आणि शुक्रवार १ डिसेंबरपासून रिफंड प्रोसेसला सुरूवात होईल. सोमवार ४ डिसेंबर रोजी कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. फ्लेअर रायटिंग आयपीओ शेअर्स मंगळवारी म्हणजेच ५ डिसेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. जर कंपनीनं T+3 स्टँडर्डवर स्विच करण्याचा निर्णय घेतला तर तारखांमध्ये बदल होऊ शकतो.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक