Sensex-Nifty flat start: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात कमालीची सुस्ती दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची फ्लॅट सुरुवात झाली. निफ्टी क्षेत्रातील सर्वच निर्देशांकात अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी तेजी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मात्र खरेदीचा कल दिसून येत आहे.
एकंदरीत बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज ९५४.३८ कोटी रुपयांनी वाढलंय, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत केवळ ९५४.३८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झाले तर बीएसई सेन्सेक्स ८१,३५२.८१ वर आणि निफ्टी ५० हा २४,८५७.९५ वर ट्रेड करत आहे. सोमवारी सेन्सेक्स ८१,३५५.८४ वर आणि निफ्टी २४,८३६.१० वर बंद झाला होता.
गुंतवणूकदारांनी कमावले ९५४ कोटी
एका दिवसापूर्वी म्हणजेच २९ जुलै २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५९,९२,१९४.८३ कोटी रुपये होतं. आज ३० जुलै २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,५९,९३,१४९.२१ कोटी रुपयांवर पोहोचल. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत केवळ ९५४.३८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे १५ शेअर ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी १५ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. त्यात एनटीपीसी, पॉवरग्रिड आणि एचयूएलमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, एचडीएफसी आणि एल अँड टी चे शेअर्स सर्वाधिक घसरले. याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, टीसीएस. मारुती सुझुकी, आयटीसी, टायटन, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, एसबीआय, महिंद्रा, इन्फोसिसमध्ये कामकाजाच्या सुरुवातीला तेजी दिसून आली.