Lokmat Money >शेअर बाजार > सपाटून विक्रीचा मारा, बाजारात घसरण; सेन्सेक्स ६१० अंकांनी कोसळला

सपाटून विक्रीचा मारा, बाजारात घसरण; सेन्सेक्स ६१० अंकांनी कोसळला

सेन्सेक्स ६१० अंकांनी कोसळला, निफ्टी १९,५३० च्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 07:18 AM2023-09-29T07:18:23+5:302023-09-29T07:18:38+5:30

सेन्सेक्स ६१० अंकांनी कोसळला, निफ्टी १९,५३० च्या खाली

Flat selling hit, stock market falls; Sensex fell by 610 points | सपाटून विक्रीचा मारा, बाजारात घसरण; सेन्सेक्स ६१० अंकांनी कोसळला

सपाटून विक्रीचा मारा, बाजारात घसरण; सेन्सेक्स ६१० अंकांनी कोसळला

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक बाजारातील कमजोर कल असताना विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू केल्याने गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स ६१० अंकांनी घसरला. निर्देशांकात मजबूत भागीदारी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि आयटीसीच्या समभागांच्या विक्रीमुळेही बाजारावर परिणाम झाला. शेअर बाजाराकडील  आकडेवारीनुसार, बुधवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ३५४.३५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

गुरुवारी बीएसईचा सेन्सेक्स ६१०.३७ अंकांनी म्हणजेच ०.९२ टक्क्यांनी घसरून ६५,५०८.३२ वर बंद झाला. ट्रेडिंगदरम्यान तो ६९५.३ अंकांवर घसरला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १९२.९० अंकांच्या किंवा ०.९८ टक्क्यांच्या घसरणीसह १९,५२३.५५ अंकांवर बंद झाला. 

आशियातही पडझड
आशियातील इतर बाजारांमध्ये चीनचा शांघाय कंपोझिट नफ्यात तर जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग-सेंग तोट्यात होता. दक्षिण कोरियातील सुट्ट्यांमुळे शेअर बाजार बंद राहिले. युरोपातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सुरुवातीच्या व्यापारात घसरण दिसून आली. बुधवारी अमेरिकन बाजारात संमिश्र कल होता. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.३८ टक्क्यांनी घसरून ९६.१८ डॉलर प्रती बॅरलवर आले.

n सेन्सेक्समध्ये टेक महिंद्राला सर्वाधिक ४.५९ टक्क्यांचे नुकसान सहन करावे लागले. 
n एशियन पेंट्स, विप्रो, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे मोठे नुकसान झाले. 
n ट्रेंडच्या विरुद्ध लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड आणि ॲक्सिस बँक यांचे शेअर वधारले. 

 

Web Title: Flat selling hit, stock market falls; Sensex fell by 610 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.