Join us

FMCG Stock Jump Today : FMCG स्टॉक्समुळे शेअर बाजारात उत्साह; मिड-कॅप शेअर्समध्ये तेजी, सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 4:03 PM

FMCG Stock Jump Today : शेअर बाजारातील अभूतपूर्व तेजीमुळे गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Stock Market Closing On 22 August 2024: जबरदस्त जागतिक संकेत आणि देशांतर्गत बाजारात देशी-विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीसह बंद झाला. आज पुन्हा एफएमसीजी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. आजच्या सत्रात मिडकॅप शेअर्समध्येही तेजी आली. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स १४८ अंकांच्या वाढीसह ८१,०५३ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४० अंकांच्या वाढीसह २४,८१० अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी १८ शेअर्स वधारले तर १२ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २५ शेअर्स वधारले तर २५ घसरले. भारती एअरटेल १.६० टक्के, टाटा स्टील १.३८ टक्के, आयसीआयसीआय बँक १.३८ टक्के, टायटन १ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ०.९१ टक्के, एशियन पेंट्स ०.८५ टक्के, मारुती ०.७३ टक्के, एसबीआय ०.४५ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.४४ टक्क्यांनी वधारले. तर दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा १.२० टक्के, एनटीपीसी १.२० टक्के, टाटा मोटर्स १.१६ टक्के, टीसीएस १.१३ टक्के, पॉवर ग्रिड ०.८३ टक्के, सन फार्मा ०.७६ टक्के, अदानी पोर्ट्स ०.७४ टक्क्यांनी घसरून बंद झाले.

पाच सत्रात मार्केट कॅप १६ लाख कोटींनी वाढलं

शेअर बाजारातील तेजीमुळे आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. बीएसईमध्ये लिस्टेड शेअर्सचं बाजार भांडवल ४६०.५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे मागील सत्रात ४५९.२४ लाख कोटी रुपये होतं. आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये १.२७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास १६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजार