Join us  

शेअर बाजारानं सलग ७ व्या दिवशी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, दिवसात कमावले ₹२.५ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 4:22 PM

शेअर बाजारांची विक्रमी वाढ बुधवारीही कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही नवीन उच्चांकावर बंद झाले.

भारतीय शेअर बाजारांची विक्रमी वाढ बुधवारीही कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही नवीन उच्चांकावर बंद झाले. सेन्सेक्समध्ये 358 अंकांची वाढ झाली, तर निफ्टी 20,938 वर पोहोचला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कामकाजाच्या सलग सातव्या दिवशी दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले आहेत. कामकाजादरम्यान, निफ्टी 20,961.95 अंकांवर पोहोचला आणि सेन्सेक्सने 69,744.62 अंकांचा नवा उच्चांकी स्तर गाठला.

बीएसई सेन्सेक्स 357.59 अंक किंवा 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 69,653.73 अंकांवर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 82.60 अंकांनी किंवा 0.40 टक्क्यांनी वाढून 20,937.70 वर बंद झाला.गुंतवणूकदारांनी कमावले 2.52 लाख कोटीBSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल  6 डिसेंबर रोजी वाढून 348.98 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवार, 5 डिसेंबर रोजी 346.46 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांनी वाढले. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.यात सर्वाधिक वाढसेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. त्यातही विप्रोच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.85 टक्क्यांनी वाढ झाली. तर आटीसी (ITC), टीसीएस (TCS), एल अँड टी (L&T) आणि टाटा मोटर्स यांचे शेअर्स 1.93 टक्के ते 2.51 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये घसरणतर सेन्सेक्समधील उर्वरित 10 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही एनटीपीसीचे शेअर्स 1.58 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. तर, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि मारुती सुझुकीचे शेअर्स 0.96 टक्के ते 1.16 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार