फ्यूचर ग्रुपचे (Future group) अधिकांश शेअर जबरदस्त आपटले आहेत. यांपैकीच एक आहे फ्यूचर एंटरप्रायजेसचा शेअर. ही कंपनी देखील दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. या कंपनीचे शेअर जवळपास 100 टक्क्यांपर्यंत आपटले आहेत.
जानेवारी 2008 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 66 रुपयांवर होती. तो आपटून आता 0.79 पैशांवर आला आहे. हा शेअर शुक्रवारी 4.82 टक्क्यांनी घसरला आहे. हा या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक आहे. गेल्या एक वर्षांपूर्वी याच दिवशी या शेअरची किंमत 8.85 रुपये होता. हा 52 आठवड्यांतील उच्चांक होता.
दिवाळखोरीच्या प्रक्रियेतील कंपनी -
किशोर बियानी यांची कंपनी फ्यूचर एंटरप्राइजेसचा दिवाळखोर प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. यानंतर, कर्जदारांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी फर्मचा लिलाव करण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकेल. गेल्या 7 मार्चला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणच्या मुंबई पीठाने कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया (CIRP) सुरू करण्याचे आदेश दिले. एनसीएलटीने कंपनीच्या व्यवस्थापनासाठी रिझोल्यूशन प्रोफेशनलची नियुक्ती केली आहे.
गुंतवणूकदारांचे 99% नुकसान -
2008 पासून आतापर्यंत गुंतवणूकदारांचे जवळपास 99 टक्के नुकसान झाले आहे. या काळात या कंपनीत कुणी एक लाख रुपयांची गुतंवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आज त्याचे 1200 रुपये झाले असते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)