Join us  

गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, झटक्यात झाले कंगाल; ₹490 शेअर आला ₹5 वर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 6:34 PM

2019 च्या एप्रिल महिन्यात कंपनीचा शेअर 490 रुपयांवर होता. यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण बघायला मिळाली. आता हा शेअर घसरून 5 रुपयांच्याही खाली गेला आहे.

शेअर बाजारातगुंतवणूकदारांना छप्परफाड नफाही मिळतो आणि अनेक वेळा मोठे नुकसानही सहन करावे लागते. बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना लखपती आणि करोडपतीही बनवले आहे. तर असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना पार कंगाल केले आहे. गुंतवणूकदारांना कंगाल करणारा असाच एक शेअर म्हणजे, फ्युचर लाइफस्टाईल फॅशन लिमिटेडचा (FLFL) आहे.

ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण दिसून येत आहे. या कंपनीचा शेअर्समध्ये सातत्याने खसरण दिसून येत आहे या शेअरची किंमत आज 4.70 रुपयांवर आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर तब्बल 75 टक्क्यांनी घसरला आहे. तर गेल्या 5 वर्षां हा शेअर 99 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचा मोठा पैसा अडकलेला आहे.

सातत्याने होतेय घसरण -फ्युचर लाइफस्टाईल फॅशल लिमिटेडच्या शेअरमध्येसातत्याने घसरण दिसून येत आहे. 2019 च्या एप्रिल महिन्यात कंपनीचा शेअर 490 रुपयांवर होता. यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण बघायला मिळाली. आता हा शेअर घसरून 5 रुपयांच्याही खाली गेला आहे. या कंपनीवर मोठे कर्ज आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकव्यवसाय