Join us  

99% घसरून ₹3 वर आला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक; 15 सप्टेंबरला होणार कंपनीचा फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 8:14 PM

कालच्या तुलनेत आज या शेअरमध्ये 4.73% ची तेजी दिसून आली. शेअरमध्ये ही तेजी कंपनीशी संबंधित एका वृत्तामुळे आली आहे.

दिवाळखोर प्रक्रियेतून जात असलेल्या फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या (एफआरएल) शेयरमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी दिसून आली. आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी हा शेअर 3.32 रुपयांवर पोहोचला. कालच्या तुलनेत आज या शेअरमध्ये 4.73% ची तेजी दिसून आली. शेअरमध्ये ही तेजी कंपनीशी संबंधित एका वृत्तामुळे आली आहे.

पुन्हा वाढली डेडलाइन -नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) कर्जबाजारी फ्यूचर रिटेल लिमिटेडची (FRL) दिवाळखोरी संदर्भातील रिझोल्यूशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविली आहे. NCLTचा हा निर्णय कंपनीच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलने ट्रिब्युनलच्या मुंबई खंडपीठासमोर सादर केलेल्या अर्जावर आला आहे. हे फ्युचर रिटेल लिमिटेडचे तिसरे एक्सटेन्शन आहे. गेल्या एप्रिल महिन्यात NCLT ने ही दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 जुलै 2023 पर्यंत 90 दिवसांची मुदतवाढ दिली होती. यानंतर एनसीएलटीने 17 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली. आता नवी मुदत 15 सप्टेंबर देण्यात आली आहे.

99 टक्क्यांनी घसरला शेअर -केवळ 5 वर्षांच्या कालावधीत हा शेअर 99 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. सप्टेंबर 2018 मध्ये या शेअरची किंमत 570 रुपयांपेक्षाही अधिक होती. शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 4.51 रुपये एवढा आहे. गेल्या वर्षी 14 सप्टेंबरला हा शेअर या किंमतीवर पोहोचला होती. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक