GAIL India : सरकारी मालकीच्या गेल इंडियाने गेल्या 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. गेल इंडिया कंपनीने गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांना 5 वेळा बोनस शेअर्सही दिले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 20 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले आणि गुंतवणूक कायम ठेवली असती तर ही रक्कम 90 लाखांपेक्षा जास्त झाली असती.
गेल इंडियाच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 115.67 रुपये आहे. 13 सप्टेंबर 2002 रोजी मुंबई शेअर बाजारावर (BSE) गेल इंडियाचे शेअर्स 7.92 रुपयांच्या पातळीवर होते. जर एखाद्या व्यक्तीने 13 सप्टेंबर 2002 रोजी गेल इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला 12626 शेअर्स मिळाले असते. तेव्हापासून कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 5 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. गुंतवणूकदाराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर सध्या बोनस शेअर्स मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला 1,01007 शेअर्स मिळाले असते. सोमवारी मुंबई शेअर बाजारावर गेल इंडियाचे शेअर्स 91.35 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. अशा स्थितीत त्या 1 लाख रूपयांचे मूल्य एकूण 92.26 लाख रुपये झाले असते.
5 वेळा बोनस शेअर्स
गेल इंडियाने गेल्या 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. GAIL India ने ऑक्टोबर 2008 मध्ये 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स ऑफर केले. कंपनीने मार्च 2017 मध्ये 1:3 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. त्यानंतर, कंपनीने मार्च 2018 मध्ये गुंतवणूकदारांना 1:3 च्या प्रमाणात बोनस शेअर्स भेट दिले. GAIL India ने जुलै 2019 रोजी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 1 शेअरमागे 1 बोनस शेअर दिला. सरकारी कंपनीने नुकतेच 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत.