Join us

शेअर बाजारात पुन्हा गॅप अप ओपनिंग, निफ्टी-सेन्सेक्स ऑल टाईम हाय लेव्हलवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 9:42 AM

शेअर बाजारात मोठ्या विकेंडनंतर मंगळवारी पुन्हा एकदा गॅप ओपनिंग झालं, ज्यात नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी १०५ अंकांच्या तेजीसह व्यवहार करू लागला आणि २३५७० च्या पातळीवर उघडला.

शेअर बाजारात मोठ्या विकेंडनंतर मंगळवारी पुन्हा एकदा गॅप ओपनिंग झालं, ज्यात नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी १०५ अंकांच्या तेजीसह व्यवहार करू लागला आणि २३५७० च्या पातळीवर उघडला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४३ अंकांनी वधारून ७७२३५ च्या पातळीवर पोहोचला. सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस आणि अॅक्सिस बँक, विप्रोचे शेअर्स सर्वाधिक तेजीसह उघडले. तेल विपणन कंपन्या बीपीसीएल आणि ओएनजीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्येही कामकाजाच्या सुरुवातीला एक टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली. 

एनर्जी, आयटी आणि एफएमसीजी, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे, तर वाहन क्षेत्रात तुलनेनं कमी खरेदीचं वातावरण दिसून आलं. मात्र, हिरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये मात्र तेजी दिसून आली. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मात्र घसरण दिसून येत आहे. 

निफ्टीने पहिल्यांदाच २३५०० च्या पुढे 

निफ्टीनं मंगळवारी इतिहासात प्रथमच २३५०० ची जादुई पातळी ओलांडली. जून एक्सपायरी सीरिजमध्ये निफ्टी २४००० ची पातळी पाहू शकतो, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. निफ्टीनं आज २३५७० चा नवा उच्चांकी स्तर गाठला, तर सेन्सेक्सनं ७७३२७ चा नवा उच्चांक गाठला. 

इथून बाजार वर जाण्यासाठी वरच्या पातळीवर कन्सोलिडेसन होणं आवश्यक आहे, अन्यथा बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून येऊ शकतं, असं जाणकारांचं मत आहे. सेन्सेक्सनं प्रथमच ७७३०० ची पातळी ओलांडली. त्यामुळे मंगळवारच्या सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्सनं नवा उच्चांक गाठला. देशांतर्गत आणि परदेशी बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण असल्यानं मोठी खरेदी दिसून येत आहे.

टॅग्स :शेअर बाजार