Lokmat Money >शेअर बाजार > गौतम अदानी पुन्हा एक पाऊल पुढे; जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत पटकावलं स्थान

गौतम अदानी पुन्हा एक पाऊल पुढे; जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत पटकावलं स्थान

मंगळवारी ट्रेडिंग दरम्यान अदानी समूहाचे बाजार भांडवल १३.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 11:24 AM2023-12-06T11:24:18+5:302023-12-06T11:25:37+5:30

मंगळवारी ट्रेडिंग दरम्यान अदानी समूहाचे बाजार भांडवल १३.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं.

Gautam Adani again in the list of world's top 20 richest person; But behind the Mukesh Ambanis | गौतम अदानी पुन्हा एक पाऊल पुढे; जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत पटकावलं स्थान

गौतम अदानी पुन्हा एक पाऊल पुढे; जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत पटकावलं स्थान

देशातील तीन राज्यांतील निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यानंतर याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. दरम्यान, अदानी समूहाच्या शेअर्समध्येही (Adani Group Shares) तुफान वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २०-२० टक्क्यांनी वाढ झाली. यासह अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ११ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे. त्यामुळे, अदानींच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली असून जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत त्यांना स्थान मिळालं आहे. 

मंगळवारी ट्रेडिंग दरम्यान अदानी समूहाचे बाजार भांडवल १३.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. अदानी समूहानं एका दिवसात आपल्या मार्केट कॅपमध्ये १.९२ लाख कोटी जोडून आपला आतापर्यंतचा सर्वात्कृष्ट सिंगल डे मार्केट परफॉर्मन्स दाखवलाय. यासह, गौतम अदानी ७०.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह (gautam adani net worth) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १६ व्या स्थानावर पोहोचले आहेत. दुसऱ्यांदा जगतील टॉप २० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना स्थान मिळालं आहे. 

गौतमी अदानी यांना गेल्या आठवड्यात १० बिलियन्स डॉलर्सचा नफा झाला आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार, आजमित्तीस अदानी यांची नेटवर्थ ७०.३० बिलियन्स डॉलर्स एवडढी आहे. त्यामुळे, ते जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत १६ व्या स्थानी पोहोचले आहेत. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अंबानींचे शेअर्स चांगलेच घसरले होते. त्यावेळी, त्यांच्या नेटवर्थलाही त्याचा फटका बसला. त्यामुळे, ते टॉप २० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले होते. जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत अदानी अद्यापही अंबानींच्या मागे आहेत. कारण, या यादीत अंबानींचा १३ वा नंबर लागतो. मुकेश अंबानी यांची नेट वर्थ ९०.४० बिलियन्स डॉलर एवढी आहे. 

अंबानींच्या शेअर्समध्ये तुफान तेजी

मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १७.०३ टक्क्यांनी किंवा ४३०.८० रुपयांनी वाढून २९६०.१० वर बंद झाला. अदानी पोर्टचे शेअर्स १५.१५ टक्क्यांनी किंवा १३३.१० रुपयांनी वाढून १०११.८५ रुपयांवर बंद झाले. अदानी पॉवरचा शेअर १५.९१ टक्क्यांनी किंवा ७३.९० रुपयांनी वाढून ५३८.५० रुपयांवर बंद झाला.

दानी एनर्जी, ग्रीनमध्ये अपर सर्किट

अदानी एनर्जीचा शेअर २० टक्क्यांनी किंवा १८०.४० रुपयांनी वाढून १०८२.६० वर बंद झाला. अदानी ग्रीनचा शेअर २० टक्क्यांनी किंवा २२४.६५ रुपयांनी वाढून १३४८ रुपयांवर बंद झाला. अदानी टोटलचे शेअर्स १९.९५ टक्क्यांनी किंवा १४६.०५ रुपयांनी वाढून ८७८.२० रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, अदानी विल्मरचे शेअर्स ९.९३ टक्क्यांनी किंवा ३४.४० रुपयांनी वाढून ३८०.७० रुपयांवर बंद झाले.

Web Title: Gautam Adani again in the list of world's top 20 richest person; But behind the Mukesh Ambanis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.