Lokmat Money >शेअर बाजार > गौतम अदानींचा एक निर्णय अन् शेअर धडाम! डिस्काउंट देऊनही गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ

गौतम अदानींचा एक निर्णय अन् शेअर धडाम! डिस्काउंट देऊनही गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ

Adani Wilmar Stock : अदानी समुहाचा एक निर्णय कंपनीच्या अंगलट आला आहे. शेअरवर डिस्काउंट देऊनही गुंतवणूकदारांनी पाठ दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:34 IST2025-01-10T14:34:14+5:302025-01-10T14:34:41+5:30

Adani Wilmar Stock : अदानी समुहाचा एक निर्णय कंपनीच्या अंगलट आला आहे. शेअरवर डिस्काउंट देऊनही गुंतवणूकदारांनी पाठ दाखवली.

gautam adani disappoints investors as adani wilmar stock crash on ofs decision of adani group | गौतम अदानींचा एक निर्णय अन् शेअर धडाम! डिस्काउंट देऊनही गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ

गौतम अदानींचा एक निर्णय अन् शेअर धडाम! डिस्काउंट देऊनही गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ

Adani Wilmar Stock Crash : कधीकधी आपला एखादा निर्णय आपल्या पूर्ण मेहनतीवर पाणी फेरतो. अदानी समुहाची अवस्था सध्या अशीच झाली आहे. अदानी कमोडिटीजने एफएमसीजी कंपनी अदानी विल्मारमधील हिस्सा विकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. मात्र, हा निर्णय गुंतवणूकदारांना फारसा आवडला नाही. त्याचा परिणाम आजच्या ट्रेडिंग सत्रातही दिसून येत आहे. विनाशकाले विपरित बुद्धी अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे. आधी कंपनीमधील हिस्सा विकण्याचा निर्णय आणि नंतर ऑफर फॉर सेलद्वारे शेअर्सची विक्री. याचा एकत्रित परिणाम असा झाला की अदानी विल्मरचा शेअर ९ टक्क्यांनी घसरला.

किरकोळ गुंतवणूकदार १३ जानेवारी रोजी OFS मध्ये सहभागी होऊ शकतील 
प्रवर्तक कंपनी अदानी कमोडिटीज ऑफर फॉर सेलद्वारे अदानी विल्मारमधील हिस्सा विकत आहे. आज १० जानेवारी २०२५ रोजी संस्थात्मक गुंतवणूकदार या ऑफर फॉल सेलमध्ये भाग घेत आहेत. १३ जानेवारीला किरकोळ गुंतवणूकदार या ऑफरमध्ये कंपनीचा स्टॉक खरेदी करण्यासाठी बोली लावू शकतात. स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये, अदानी विल्मरने सांगितले की, कंपनीची प्रवर्तक असलेली अदानी कमोडिटीज कंपनीच्या एकूण पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या १३.५० टक्के शेअर्सची विक्री करत आहे.

OFS ची फ्लोअर किंमत २७५ रुपये
विक्रीसाठीच्या या ऑफरमध्ये, अदानी विल्मरने फ्लोअर किंमत २७५ रुपये ठेवली आहे. गुरुवारी बंद झालेल्या किमतीत १५ टक्के सूट देण्यात आली आहे. असे असतानाही शुक्रवारी अदानी कमोडिटीजच्या या निर्णयामुळे अदानी विल्मारचा शेअर सपाटून खाली पडला आहे.

शेअर ऑल टाईम हायवरुन ६८ टक्के खाली
अदानी विल्मरचा IPO फेब्रुवारी २०२२ मध्ये आला होता. कंपनीने २३० रुपयांच्या इश्यू प्राइसवर पैसे उभे केले होते. अदानी विल्मरच्या शेअरने मल्टीबॅगर परतावा दिला असून तो ८७८ वर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड कायम राहिला. हा शेअर आता उच्चांकावरून सुमारे ६८ टक्क्यांनी खाली व्यवहार करत आहे.

Web Title: gautam adani disappoints investors as adani wilmar stock crash on ofs decision of adani group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.