Lokmat Money >शेअर बाजार > अखेर हिंडेनबर्गचा कहर संपला! अदानी समूहाचा नफा 6 महिन्यांत दुप्पट

अखेर हिंडेनबर्गचा कहर संपला! अदानी समूहाचा नफा 6 महिन्यांत दुप्पट

हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे खाली आलेल्या अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये पुन्हा उसळी पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:04 PM2023-11-23T17:04:33+5:302023-11-23T17:04:41+5:30

हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे खाली आलेल्या अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये पुन्हा उसळी पाहायला मिळत आहे.

Gautam Adani: Hindenburg is finally over! Adani Group's profit doubles in 6 months | अखेर हिंडेनबर्गचा कहर संपला! अदानी समूहाचा नफा 6 महिन्यांत दुप्पट

अखेर हिंडेनबर्गचा कहर संपला! अदानी समूहाचा नफा 6 महिन्यांत दुप्पट

Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष खूप वाईट गेले आहे. जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला. पण, या यातून गौतम अदानी इतक्या लवकर सावरतील, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. अद्याप त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स पूर्वीच्या पातळीवर पोहोचले नाहीत, पण गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत कंपन्यांच्या नफ्यात दुपटीने वाढ झाली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी समूहाच्या 9 सूचीबद्ध कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, त्यांच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 107.7 टक्क्यांनी वाढ केली आहे. दुसरीकडे, निव्वळ विक्रीत 14 टक्के घटही झाली आहे. 

अदानी समूहाच्या नफ्यात प्रचंड वाढ
अदानी समूहाच्या 9 सूचीबद्ध कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली अन् हा नफा 23,929 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2024 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपन्यांच्या निव्वळ विक्रीत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. हे 14 टक्क्यांनी कमी होऊन 1.49 ट्रिलियन रुपयांवर आले आहे. या कालावधीत शेअर बाजारात सूचिबद्ध इतर कंपन्यांच्या विक्रीत 8.1 टक्के वाढ झाली आहे. आपण निव्वळ नफ्याबद्दल बोललो तर त्यात 13 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

  • अदानी ग्रुपच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 0.17 टक्क्यांच्या वाढीसह 2176 रुपयांवर बंद झाले.
  • अदानी पोर्टचे शेअर्स 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 792.80 रुपयांवर बंद झाले. 
  • अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये 1.32 टक्क्यांची घसरण झाली आहे. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स 381.65 रुपयांवर दिसले. 
  • अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये आज 0.34 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि बाजार बंद होताना कंपनीचे शेअर्स 724 रुपयांवर आले. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आणि सेन्सेक्स बंद होईपर्यंत कंपनीचे शेअर्स 932.90 रुपयांवर दिसले. 
  • अदानी टोटल गॅसचे शेअर्स 0.18 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. 
  • अदानी विल्मरचे शेअर्स 0.27 टक्क्यांच्या किंचित वाढीसह बंद झाले. सेन्सेक्सवर हा शेअर 314.80 रुपयांवर आहे. 
  • सिमेंट कंपनी ACC लिमिटेडचा शेअर 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 1819.25 रुपयांवर बंद झाला.
  • अंबुजा सिमेंटचा शेअर 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 415.50 रुपयांवर बंद झाला.
  • मीडिया कंपनी NDTV चा शेअर 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 191.90 रुपयांवर बंद झाला.

Web Title: Gautam Adani: Hindenburg is finally over! Adani Group's profit doubles in 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.